कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज; या आहेत देशातील सर्वात स्वस्त तीन MotorCycles By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:42 PM 2021-08-24T15:42:45+5:30 2021-08-24T15:57:30+5:30
सध्या देशात Petro, Diesel च्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे एकतर Electric Vehicles किंवा अधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे अनेकांचा कल असल्याचं दिसून येत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांच्याच खिशाला कात्री बसली आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक चांगल्या मायलेजसह परवडणाऱ्या बाईककडे वळत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने हा एक मोठा पर्याय म्हणून समोर आला असला तरी ती अजूनही जनतेच्या आवाक्याबाहेर आहेत. आज, या लेखात, आम्ही तुम्हाला देशातील त्या 3 परवडणाऱ्या मोटरसायकल्सची ओळख करून देऊ जे कमी किमतीत चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहेत.
हीरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटोच्या बाईक्सचा बाइक्सच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. या बाइक्सच्या किंमती देखील अपडेट करण्यात आल्या आहेत. पण असं असलं तरी या देशातील सर्वात स्वस्त बाईक आहेत.
एवढेच नाही तर त्यांच्या उपयुक्ततेमुळे आणि परफॉर्मन्समुळे या बाईक्स लोकांची पहिली पसंती बनल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या मोटारसायकल्सविषयी.
Hero HF 100 बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या HF Deluxe सारखीच दिसते, परंतु कंपनीने त्यात काही बदल केले आहेत ज्यामुळे त्याची किंमत कमी करण्यात आली आहे.
कंपनीने या बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, ही बाईक डिलक्स मॉडेलच्या धर्तीवर 97.2cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडर इंजिनसह येते.
हे इंजिन 8.36PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. उत्तम मायलेज आणि कामगिरीसाठी फ्युअल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
या बाईकमध्ये कंपनीने 9.1 लीटर क्षमतेचा फ्युअल टँक दिला आहे. या बाईकची एक्स शोरूम दिल्लीची किंमत 49,800 रूपये आहे आणि ही बाईक ७० ते ७५ किमी प्रति लीटरचं मायलेज देते.
बजाज सीटी 100 ही प्रवासी विभागात सर्वात स्वस्त बाईक आहे. यामध्ये कंपनीने नवीन BS6 मानक 102cc क्षमतेचे एअर-कूल्ड, सिंगल सिलिंडर फ्युअल इंजेक्टेड इंजिनचा वापर केला आहे.
जे 7.5bhp ची पॉवर आणि 8.34Nm चं टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससह येते. ही देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे, तिचे मायलेजही खूप चांगलं आहे.
कंपनीच्या एंट्री लेव्हल बाईक CT100 बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्याची किंमत 1,498 रुपयांपर्यंत वाढवली आहे, त्यानंतर त्याची किंमत 49,152 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) झाली आहे. ही बाईकदेखील ७० ते ७५ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.
Bajaj Platina 100 ही बाईक बाजारात एकूण दोन प्रकारांमध्ये येते, ज्यात ड्रम आणि अलॉय व्हेरिअंट्सचा समावेश आहे. कंपनीने या बाईकमध्ये 102cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर एअर कूल्ड डीटीएसआय इंजिन देखील वापरले आहे.
हे इंजिन 7.9PS पॉवर आणि 8.3Nm टॉर्क जनरेट करते. अलीकडे, कंपनीने या दोन्ही प्रकारांच्या किंमतीत 749 रुपयांची वाढ केली आहे. या बाईकमध्ये कंपनीने एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स आणि लाँग सीटसह टँक पॅड दिला आहे.
याशिवाय, सेमी डिजिटल अॅनालॉग कन्सोल देखील त्यात उपलब्ध आहे.या बाकईकची किंमत ५४,६६९ रूपयांपासून ५६,४८० रूपयांच्या दरम्यान आहे. या बाईकचं मायलेज ८० किलोमीटर प्रति लीटर पर्यंत आहे. दरम्यान, सर्वा बाईक्सचं मायलेज हे रस्त्यांची स्थिती आणि चालवण्याच्या पद्धतीवर अवंबून आहे.