Hero MotoCorp: पुन्हा सुरू झाले हिरोच्या 'या' अॅडव्हेंचर बाईकचे बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:30 PM2022-01-21T12:30:01+5:302022-01-21T12:35:05+5:30

Hero MotoCorp: कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही मोटरसायकल भारतीय बाजारात लॉन्च केली होती.

हिरो मोटो कॉर्प(Hero MotoCorp) ही मोटारसायकल आणि स्कूटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आता कंपनीने गुरुवारी आपली नवीन मोटरसायकल XPulse 200 4 Valve ची ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Hero XPulse 200 4 Valve ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 1,30,150 रुपये आहे. ही मोटरसायकल भारतातील सर्व डीलरशिपवर उपलब्ध असेल. ही मोटारसायकल कंपनीच्या eSHOP या ऑनलाइन पोर्टलवरुन बुक केली जाऊ शकते.

कंपनीने बाइकच्या बुकिंगसाठी 10,000 रुपये निश्चित केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांची यूजर फ्रेंडली सिस्टीम ग्राहकांना निर्णय घेणे, वाहन खरेदी आणि वितरण या सर्व टप्प्यांवर मदत करेल.

कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Hero XPulse 200 4 Valve मोटरसायकल भारतीय बाजारात लॉन्च केली होती. त्यानंतर बाईकच्या डिलिव्हरीला प्राधान्य देत कंपनीने डिसेंबर महिन्यात बाईकचे बुकिंग तात्पुरते थांबवले.

आता ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनीने पुन्हा एकदा या मोटरसायकलचे बुकिंग सुरू केले आहे. पहिल्या बॅचची पूर्णपणे विक्री झाल्यानंतर कंपनीने दुसऱ्या बॅचसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

कंपनीने XPulse मोटरसायकलला परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम 200cc मोटरसायकल म्हणून लॉन्च केले आहे. Hero MotoCorp चा दावा आहे की XPulse 200 4 Valve ही X पोर्टफोलिओमधील एक शक्तिशाली मोटरसायकल आहे.

या नवीन मोटारसायकलमध्ये अपग्रेडेड ऑइल कूलिंग सिस्टीम, उत्तम सीट प्रोफाइल आणि अपडेटेड एलईडी हेडलॅम्पसह अनेक अपडेट्स मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.

नवीन Hero XPulse 200 4V बाईकमध्ये 200cc, 4-स्ट्रोक, 4 वाल्व, सिंगल सिलेंडर, ऑइल कूल्ड, SOHC इंजिन आहे. हे इंजिन 8500 rpm वर 19.1 PS ची कमाल पॉवर आणि 6500 rpm वर 17.35 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Hero XPulse 200 4V बाईकचे स्विच गीअर्स अंटीग्रेटेड स्टार्टर आणि इंजिन कट ऑफ स्विचसह अपडेट केले गेले आहे. जुन्या मॉडेलप्रमाणेच, नवीन बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, ब्लूटूथ सक्षम इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सिंगल चॅनल एबीएस यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.

आरामदायी राइडसाठी Hero XPulse 200 4V ला संरक्षणात्मक विंडशील्ड, दर्जेदार सीट, USB चार्जर, बंजी हुक असलेली लगेज प्लेट मिळेल. कंपनीने नवीन बाईक तीन नवीन रंगांच्या पर्यायांसह सादर केली आहे. यात ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्लू आणि रेड या रंगांचा समावेश आहे.