Holi 2021: होळीच्या रंगापासून 'अशी' ठेवा आपली गाडी सुरक्षित; पाहा, काही सोप्या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 04:46 PM 2021-03-27T16:46:04+5:30 2021-03-27T16:51:15+5:30
holi 2021 होळी सणाच्या निमित्ताने रंगांची उधळण करताना आपल्या गाडीवर रंग लागला तर काय करावे? आपली गाडी कशी सुरक्षित ठेवावी? जाणून घ्या... (tips for protect your bike car and vehicle from holi colours) मराठी वर्षातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे होळी. देशभरात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. यंदा २८ मार्च रोजी होळी असून, २९ मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाईल.
संपूर्ण देशभरात धुलिवंदन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाते. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (tips for protect your bike from holi colours)
होळी हा रंगांचा सण आहे. बुरा ना मानो होळी है, असे म्हणत अनेक जण एकमेकांना रंग लावत असतात.लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी रंगाची उधळण होळीला केली जाते.
कोरोनाची टांगती तलवार असली तरी काही हौशी मंडळी सोसायटी, गल्लीत किंवा बिल्डिंगमध्ये होळी खेळण्याची संधी साधत असतात. होळीनिमित्ताने रंगांची उधळण करताना आपली आवडती, खास गाडी रंगांमुळे खराब होण्याची शक्यता असते. होळीच्या रंगापासून गाडी सुरक्षित कशी ठेवता येईल, याबाबत जाणून घेऊया... (tips for protect your car from holi colours)
तुमच्याकडे गॅरेज असेल तर कोणतीही चिंता नाही. दुसरीकडे जर बाइक ओपन जागेवर पार्क केली असेल तर तुम्हाला थोडी समस्या निर्माण होऊ शकते. कारण बाहेर गाडी पार्क केली, तर रंग खेळताना तुमच्या गाडीवर ते उडण्याची शक्यता अधिक बळावते.
तुमच्या गाडीसाठी तुम्हाला वॉटरप्रूफ कव्हर खरेदी करता येऊ शकते. या कव्हरला कोणतेही छिद्र नाही, याची खात्री करून घ्यावी. प्लास्टिक कव्हरची शीट तुमची गाडी सुरक्षित ठेऊ शकेल. (tips for protect your vehicle from holi colours)
एखाद्या अरुंद गल्लीत गाडी उभी केली असेल, तर त्यावर रंग उडण्याची जास्त शक्यता असते. गाडीला वॅक्स पॉलिश करून घेण्याचा पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध आहे. व्हॅक्स पॉलिशमुळे ऑइल पेंट किंवा रंगापासून गाडी सुरक्षित राहू शकेल, असे सांगितले जाते.
होळीनंतर आपल्या गाडीची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. त्यात कुठेही रंग लागला असेल, तर त्याला क्लिनिंग सोल्यूशन करून तात्काळ साफ करा. यानंतर पेंट किंवा पॉलिश करा. त्यामुळे गाडी सुरक्षित राहते.
होळी खेळताना तुमच्या गाडीला रंग लागला, तर काय करावे, असा प्रश्न सहजपणे पडू शकतो. जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर गाडी स्वच्छ पाण्याने धुवून काढा. त्यावर वेक्सिंग करा.
सर्वांत आधी आपल्या गाडीच्या किंवा स्कूटरवर लागलेला रंग पुसून काढण्यासाठी प्रीमियम क्वॉलिटीच्या वॉशिंग मशीन शॅम्पूचा वापर करा. त्यानंतर चमक कायम ठेवण्यासाठी त्यावर एक पॉलिश लावा.
दरम्यान, होळी उत्सवाची तयारी बरेच दिवस अगोदरच सुरू होते. देशातील अनेक ठिकाणी होळीचा उत्सवही साजरा करण्यात येतो. अयोध्या, मथुरा, ब्रीज, द्वारका येथे अनोख्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो.
होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते.