Honda Goldwing: ऐकावं ते नवलंच! बाईकमध्ये 'एअरबॅग', Honda ची Goldwing भारतात लॉन्च; किंमत तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:07 PM2022-04-20T16:07:13+5:302022-04-20T16:12:20+5:30

Honda Goldwing: होंडाने त्यांची नवीकोरी गोल्डविंग बारतात लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये कारसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कारमध्ये एअरबॅग (Air Bag) असणे सामान्य बाब आहे. पण, तुम्ही कधी बाईकला एअरबॅग पाहिली आहे का? आता बाईकलाही एअरबॅग असणार आहे. होंडा मोटरसायकिल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात अशीच एक बाईक लॉन्च केली आहे.

होंडाच्या या नवीन मोटारसायकलमध्ये सुरक्षेसाठी एअरबॅग बसवण्यात आले आहे. Honda GoldWing Tour असे या बाईकचे नाव असून, याची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल.

या बाईकच्या किमतीत तुम्ही टोयोटाची फॉर्च्यूनर (Fortuner) गाडी खरेदी करू शकता. फॉर्च्यूनरची एक्स-शोरुम किंमत सूमारे 32 लाख रुपयांपासून सुरू होते, तर होंडा गोल्ड विंग टूरची एक्स-शोरूम किंमत 39.20 लाखांपासून सुरू होते.

कंपनीने मुंबई,गुरुग्राम,बंगळुरू, इंदुर, कोच्ची, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकातामधील एक्सक्लूसिव बिगविंग टॉपलाइन डीलरशिप(Bigwing Topline Dealership) वर या लक्झरी बाईकची बुकिंग सुरू केली आहे.

चेन्नई, कोच्ची आणि बंगळुरूमध्ये या बाईकची एक्स-शोरुम किंमत 40 लाखांपेक्षा जास्त आहे. कंपनीने या बाइकमध्ये 1,833 सीसीचे इंजिन दिले, जे 170 Nm टॉर्क जेनरेट करण्यास सक्षम आहे.

होंडा गोल्डविंग टूरमध्ये एअरबॅगसोबत अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. यात एक्सटेंडेड इलेक्ट्रिक स्क्रीन (Extended Electric Screen), 7 इंच टीएफटी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले स्क्रीन (TFT Liquid Crystal Display Screen) दिला आहे.

याशिवाय, यात जारोस्कोपदेखील आहे, जो बोगद्यातही रायडरला नॅविगेशनची सुविधा देतो. याशिाय, यात अॅपल कारप्ले (Apple CarPlay) आणि अँड्रॉयड ऑटो (Android Auto)देखील आहे. कनेक्टिविटी साठी ब्लूटूथ (Bluetooth) आणि यूएसबी टाइप-सी (USB Type-C) सारखे सॉकेट आहेत.

गोल्ड विंग बाइकमध्ये क्रूज कंट्रोल (Cruise Control) आणि कारप्रमाणे ऑटोमॅटिक ट्रांसमिशन (Automatic Transmission) चे फीचर आहे. यात चार ऑटोमॅटिक राइड मोड असून, होंडा सेलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) फीचरदेखील आहे. बाइकचे सस्पेंशन अॅडजस्ट केले जाऊ शकतात. तसेच, यात 21 लीटरचा पेट्रोल टँकदेखील आहे.