Honda CBR650R 2022: Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 04:55 PM2022-01-25T16:55:34+5:302022-01-25T16:59:09+5:30

Honda CBR650R 2022: या बाईकमध्ये 649cc, DOHC 16-व्हॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12,000 rpm वर 64 kw ची पॉवर आणि 8,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क जेनरेट करते.

मिडलवेट स्पोर्ट्स बाइक कॅटेगरीमध्ये भारतीय रायडिंग कम्युनिटीचा जोश वाढवण्यासाठी Honda Motorcycle & Scooter India (होंडा मोटरसाइकल अँड स्कूटर इंडिया) ने नवीन 2022 CBR650R (2022 सीबीआर650आर) बाईक लॉन्च केली आहे.

होंडाच्या या नवीन बाईकचे सीकेडी (कम्पलीटली नॉक्ड डाउन) यूनिट म्हणून भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. या बाईकला होंडाच्या एक्सक्लूसिव्ह बिगविंग टॉपलाइन शोरुममधून बूक करता येईल.

कंपनीचा दावा आहे की, जबरदस्त परफॉर्मेंस आणि लूक्स असलेली ही नवीन 2022 CBR650R आपल्या क्लासिक फास्ट ‘पिक-अप’सह हार्ड हिटिंग टॉप अँड रेंजमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.

आरामदायक राईड आणि उत्कृष्ट लूकसह या नवीन CBR650R बाईक मॅट गनपाउडर म्हणजेच ब्लॅक मेटॅलिक कलर आणि नवीन स्पोर्टी ग्राफिक्स म्हणजेच ग्रांड प्रिक्स रेड कलरमध्ये उपलब्ध आहे.

या बाईकमध्ये नवीन अप्पर आणि लोवर फेअरिंग्स, मस्कुलेरिटीसोबत स्लिम बॉडी देण्यात आली आहे. तसेच, यात सीट युनिट रिअर एंडला कॉम्पॅक्ट आणि लहान लूक देण्यात आला आहे.

या बाईकमध्ये 649cc, DOHC 16-व्हॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12,000 rpm वर 64 kw ची पॉवर आणि 8,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क जेनरेट करते.

ही नवीन 2022 CBR650R बाईकची गुरुग्राममध्ये एक्स-शोरुम किंमत 9,35,427 रुपये ठेवण्यात आली आहे. होंडाने आपले एक्सक्लूसिव्ह प्रीमियम डीलरशिप्स- गुरुग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बँगळुरू (कर्नाटक), इंदुर (मध्य प्रदेश), कोची (केरळ), हैदराबाद (तेलंगाणा) आणि चेन्नई (तमिलनाडु) मध्ये बिगविंग टॉपलाइनवर उपलब्ध आहे.