Honda relaunches new CR-V; Price of 28 lakhs
होंडाची नवीकोरी CR-V लाँच; किंमत 28 लाखांपासून By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:32 PM2018-10-09T16:32:35+5:302018-10-09T16:38:43+5:30Join usJoin usNext Honda ची दणकट कार CR-V पुन्हा एकदा भारतीय बाजारात धुमाकुळ घालण्यास सज्ज झाली आहे. या कारला आज नव्या अवतारामध्ये लाँच करण्यात आले. एक्स शोरूम किंमत 28.15 लाख रुपयांपासून सुरु होत असून टॉप एंड मॉडेलची किंमत 32.75 लाखांवर जात आहे. होंडाच्या सीआरव्ही कारला भारतात पहिल्यांदा 2002 मध्ये लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून सीआरव्ही ही कार श्रीमंतांच्या ताफ्यात दिसत होती. मात्र, गेल्या काही वर्षात या कारला फोर्ड एंडोव्हर, टोयोटाची फॉर्च्युनरसारखे स्पर्धक उपलब्ध झाल्याने सीआरव्हीची मागणी घटली होती. 2018 Honda CR-V यावेळी पेट्रोल इंजिनासोबत डिझेलच्या पर्यायातही मिऴणार आहे. या एसयुव्हीमध्ये 1.6 लीटरचे नवीन डिझेल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञान देण्यात आले आहे. पुढील भागालाही नवीन रुपडे देण्यात आले असून एलईडी हेडलँप, फॉग लँपही देण्यात आला आहे. पेट्रोलसाठी 2.0 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिन 154 बीएचपी ताकद 192Nm चा टॉर्क देते. तर डिझेलचे इंजिन 120 बीएचपी ताकद आणि 300Nm चा टॉर्क उत्पन्न करते. डिझेल इंजिनला 9 स्पीड अॅटोमॅटीक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. सीआरव्ही पहिल्यांदाच 7 सीटरच्या पर्यायामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. होंडाच्या सिव्हीकच्या प्लॅटफॉर्मवर ही नवी सीआरव्ही बनविण्य़ात आली आहे. नवीन सिव्हीकही लवकरच भारतात लाँच होईल. नव्या होंडा सीआरव्हीमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. जी अॅप्पल आणि अँड्रॉईडच्या स्मार्टफोनला जोडता येते. याशिवाय इंस्ट्रुमेंटल पॅनलसाठी टीएफटी डिस्प्लेही देण्यात आला आहे. सीआरव्हीच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत 30 मीमी लांबी, 35 मीमी रुंदी आणि उंची वाढविण्यात आली आहे. तसेच व्हीलबेसही 40 मीमीने वाढविण्यात आला आहे.टॅग्स :होंडाकारवाहन उद्योगHondacarAutomobile Industry