Honda चा न्यू इयर धमाका! 3,999 मध्ये घरी आणा Activa आणि Shine, जाणून घ्या ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:56 PM2023-01-01T15:56:40+5:302023-01-01T16:00:57+5:30

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी कंपनी होंडा आपल्या दुचाकींवर आकर्षक ऑफर देत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा टू-व्हीलर्स आपल्या दुचाकींवर आकर्षक ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्टिव्हा आणि शाईनवर जबरदस्त फायनान्स ऑफर आणल्या आहेत. या अंतर्गत, अत्यंत कमी डाऊन पेमेंटवर दुचाकी फायनान्स मिळण्याव्यतिरिक्त, ग्राहकांना कॅशबॅकचा लाभ देखील दिला जातोय.

ऑफर काय आहे?- Honda च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक फक्त 3,999 रुपयांचे डाउन पेमेंट भरून टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक 5,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 7.99% व्याजदर देखील मिळवू शकतात. ही ऑफर कंपनीच्या निवडक मॉडेल्स आणि ग्राहकांसाठी दिली जात असून, 8 जानेवारी 2023 पर्यंत वैध आहे. ही सुविधा निवडलेल्या वित्त भागीदारांद्वारे (बँका) दिली जाईल.

Honda Activa 6G: Honda Activa ही कंपनीची स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. ही स्कूटर 110 cc आणि 125 cc अशा दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहे. आम्ही 110 मॉडेलबद्दल बोलत आहोत, यात 109cc इंजिन देण्यात आले आहे, जे 7.97PS पॉवर आणि 9Nm टॉर्क जनरेट करते. यात एलईडी हेडलाइट देखील मिळतात.

कंपनीने या स्कूटरमध्ये ACG स्टार्टर मोटर दिली आहे, जी इंजिन किल स्विच तंत्रज्ञानासह येते. ब्रेकिंगसाठी, यात 130mm ड्रम ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आले आहे. सेन्सर-आधारित PGM-FI प्रणाली देखील समाविष्ट आहे. या स्कूटरची किंमत 73,176 रुपये ते 76,677 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Honda Shine : तुम्ही चांगली परफॉर्मन्स बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Honda Shine हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर 124cc एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन वापरले आहे, जे 10.7PS पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये कंपनीने आजकालच्या ट्रेंडप्रमाणे एलईडी दिलेले नाही. यात एक बेसिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो बाइकचा वेग, ओडोमीटर, इंधन गेज इत्यादी माहिती देतो.

कंपनीने या बाइकला पारंपारिक सायलेंट स्टार्ट, अल्टरनेट करंट जनरेटर (ACG) तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे. या गाडीचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. याशिवाय समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस प्री-लोडेड अॅडजस्टेबल शॉकर उपलब्ध आहे. या बाईकमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (CBS) देण्यात आली आहे. याची किंमत 77,592 रुपये ते 83,092 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहे.