कारचे अ‍ॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:41 PM2021-02-01T14:41:45+5:302021-02-01T14:50:20+5:30

how to increase car mileage? petrol, diesel : आताच कृषी सेस लागणार असल्याची बातमी आली आहे. हा सेस कंपन्यांनी भरायचा असेल तर ठीक नाहीतर त्याचा भारही आपल्याच खिशावर आला तर मग सायकल घेऊन फिरावे का असा प्रश्न पडणार आहे. सध्यातरी आपल्या हातात कारचे मायलेज वाढविणे एवढेच आहे. जर तुमची कार कमी मायलेज देऊ लागली असेल तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला ६ छोट्या छोट्या ट्रीक सांगणार आहोत.

इंधनाचे दर चढे आहेत. पुढील काळात पेट्रोलने शंभरी आणि डिझेलने नव्वदी नाही गाठली तर करलाभापेक्षा खूप दिलासादायक ठरेल. परंतू तसे जरी झाले तरीही सध्याचे दर खिसा कापणारे आहेत.

आताच कृषी सेस लागणार असल्याची बातमी आली आहे. हा सेस कंपन्यांनी भरायचा असेल तर ठीक नाहीतर त्याचा भारही आपल्याच खिशावर आला तर मग सायकल घेऊन फिरावे का असा प्रश्न पडणार आहे.

सध्यातरी आपल्या हातात कारचे मायलेज वाढविणे एवढेच आहे. जर तुमची कार कमी मायलेज देऊ लागली असेल तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला ६ छोट्या छोट्या ट्रीक सांगणार आहोत.

या ट्रीकच्या आधारे तुम्ही तुमच्या वाहनाचे 10 टक्के मायलेज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला काही नवीन कार घेण्याची किंवा मोठे बदल करण्याची गरज नाहीय...चला तर मग जाणून घेऊया...

सारखा सारखा ब्रेक लावणे किंवा कमी अंतरासाठी जोरात अॅक्सलरेट करणे यामुळे इंधन जास्त लागते. शहरात हा प्रकार नेहमीच होतो. कारण घाईत वाट काढण्यासाठी वेग वाढविणे आणि ब्रेक लावणे हे प्रकार होतात. हे प्रकार कमी केले तर मायलेज वाढेल.

तुमची कार जेवढी वेगाने चालविणार तेवढेच इंजिन जास्त ताकद घेणार. याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर पडणार आहे.

जर तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर वाहनाचे मायलेज कमी होते. बरेच दिवस टायरमध्ये हवा भरली जात नाही. यामुळे थोड्या थोड्या काळाने टायरची हवा तपासून घ्यावी.

जर तुमच्या कारचा एअर फिल्टर खराब झाला असेल तर त्याचा थेट परिणाम हा इंजिनावर पडतो. यामुळे इंजिन इंधन वेगाने जाळायला सुरुवात करते व मायलेज घटते. फिल्टरमध्ये धूळ, माती आणि केस, पिसे आदी घटक अडकतात. हा फिल्टर चेक करत रहावा. गरज असेल तर बदलावा साफ करावा.

जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर टायरमध्ये नायट्रोजन भरून घ्यावा. याचे फायदेही अधिक आहेत. टायरमध्ये हवा लवकर लीकेज होते, तर नायट्रोजनला वेळ लागतो. यामुळे जर योग्य प्रमाणात हवा राहिली तर 30 टक्के जास्त मायलेज नियंत्रणात ठेवता येते.

जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर वेगावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कार 45 ते 60 किमी प्रतितासाच्या वेगाने चालवावी लागणार आहे. या रेंजवर सर्वाधिक मायलेज मिळते. कार जास्त वेगाने किंवा अगदीच कमी वेगाने चालविली तरीदेखील इंधन जास्त जळणार आहे. तसेच सारखे सारखे गरज नसेल तेव्हा गिअर बदलणेही अनावश्यक आहे.

कारची सर्व्हिस वेळेवर आणि नीट नसेल तर त्याचा कारच्या मायलेजवर मोठा परिणाम जाणवतो. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास कारचे पार्ट आणि इंजिन चांगल्याप्रकारे काम करतात.