How to increase the life of the clutch plate of the car? Avoid these habits
कारच्या क्लच प्लेटचे आयुष्य कसे वाढवाल? या सवयी टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:46 PM2019-04-26T13:46:53+5:302019-04-26T13:50:12+5:30Join usJoin usNext मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये गिअरबॉक्स आणि इंजिनच्या मध्ये क्लचची भूमिका खूप महत्वाची असते. त्यामुळे या क्लच प्लेट्सची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा क्लचप्लेटस् बदलाव्या लागू शकतात. हा खर्च 10 - 12 हजारांत जातो. वाहन चालवितानाच्या चुकीच्या सवयी या क्लचप्लेट खराब करतात. या सवयी सुधारल्यास क्लचचे आयुष्य वाढण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला वेळेआधीच क्लच प्लेट बदलण्याची आवश्यकता भासत नाही. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेले असताना बरेचजण क्लच दाबून ठेवतात. त्यांना पुढील काही सेकंद पुढे जायचे नसल्याचे माहिती असते. क्लच सुरक्षित ठेवायचा असेल तर असे न करता गाडीचा गिअर न्यूट्रल करावा आणि ब्रेक दाबून ठेवावा. बरेचजण कार चालविताना क्लच खूप लवकर सोडतात. यामुळे इंजिनला थोडासा झटका बसतो. ही कृती तोट्याची आहे. याचा परिणाम क्लच प्लेटसह इंजिन आणि ट्रान्समिशनवर होतो. अनेक कारमध्ये डेड पॅनेल म्हणजेच क्लचवरचा पाय दुसरीकडे ठेवण्याची जागा नसते. यामुळे चालक क्लचवरच पाय ठेवतात. हलकासा जरी पाय ठेवला तरीही क्लच दाबला जातो. आणि प्लेट एकमेकांवर घासू लागतात. यामुळे प्लेट तापून जळतात. ही सवय सोडावी लागेल. गाडी जोरात उठविण्यासाठी किंवा चालविण्यासाठी अनेकदा चालक क्लच पॅडल न सोडता अॅक्सलरेट करतात. हा प्रकार गाडीमध्ये जादा वजन आहे किंवा चढणीला आहे तेव्हा ठीक आहे. पण वारंवार असे केल्याने क्लच प्लेट वेळे आधीच रिप्लेस कराव्या लागतात.टॅग्स :कारवाहनcarAutomobile