वाहन चालक परवान्याला आधार कार्ड लिंक कसे कराल? जाणून घ्या स्टेप्समध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:04 PM2019-01-30T13:04:57+5:302019-01-30T13:08:38+5:30

केंद्र सरकारने आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक केल्यामुळे करचोरी रोखण्य़ास यश मिळालेले असतानाच आता रस्ते अपघात आणि चालकांचे पलायन रोखण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या काही दिवसांत आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसनला जोडणे बंधनकारक होणार आहे. यामुळे अपघात केल्यानंतर पुन्हा बनावट चालक परवाना काढणे शक्य होणार नाही. प्रश्न असा उरतोय की आधार-लायसन कसे लिंक करावे...चला पाहुया...

सर्वात आधी मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये वेब ब्राऊजरवर https://parivahan.gov.in/sarathiservice7/stateSelection.do ही लिंक टाकावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.

राज्य निवडल्यानंतर दुसरे वेबपेज उघडेल. यामध्य़े डाव्या बाजुला मेनू बारमध्ये Apply Online दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. Apply Online वर क्लीक केल्यानंतर त्याच्याखाली काही पर्याय दिसतील. त्यातील Services on Driving Licence (Renewal/Duplicate/Aedl/Others) हा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर नवीन विंडोमध्ये Continue बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यास पुढील विंडोवर तुमच्या ड्रायव्हिंग लायसनची माहिती भरावी लागेल.

यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक विचारला जाईल. तेथे मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला ओटीपीवरून तुम्ही माहिती अपडेट करू शकणार आहात.