Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:37 PM 2022-02-10T16:37:50+5:30 2022-02-10T16:50:07+5:30
कंपनीनं Mahindra XUV300 EV च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. महिंद्रानं (Mahindra And Mahindra) आपली महिंद्रा एक्सयुव्ही 300 एसयुव्ही कारचं (Mahindra XUV 300 Car) फुल इलेक्ट्रीक व्हर्जन भारतात लाँच करणार असल्याची घोषणा केली. कंपनीनं गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. पुढील वर्षाच्या चौथ्या तिमाहित ही कार भारतात लाँच केली जाईल.
सध्या इलेक्ट्रीक कार (Electric Car segment) मध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) ही कंपनी आघाडीवर आहे. सध्या टाटा मोटर्सच्या तीन इलेक्ट्रीक कार्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
महिंद्राच्या या कारची टक्कर टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV), एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) आणि ह्युंदाई कोना ईव्ही (Hyundai Kona EV) या कार्सशी होणार आहे. सध्या टाटा मोटर्ससह अनेक कंपन्या आपल्या नव्या इलेक्ट्रीक गाड्यांवरुन पडदा उठवत आहेत.
Tata, Hyundai आणि MG सारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रीक कारच्या मार्केटवर आधीच कब्जा करण्यास सुरूवात केली आहे. इतकंच नाही तर आता त्यांच्या इलेक्ट्रीक कार्स भारतीय रस्त्यावर धावतही आहेत.
त्याच वेळी, मारुती सुझुकी वॅगनआर ईव्ही लवकरच बाजारात दाखल होणार आहे. आता महिंद्राने आपल्या इलेक्ट्रीक कारची माहिती शेअर करून बाजारात आणखी स्पर्धा तयार केली आहे.
सध्या महिंद्रा ही कंपनी तीन-चार इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि लवकरच इलेक्ट्रीक वाहनाविषयी तपशीलवार माहिती देणार असल्याची माहिती महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिश शाह यांनी गुरुवारी दिली.
XUV300 संकल्पना गेल्या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होतीय त्यात दोन बॅटरी पॅक पर्याय होते, ज्यापैकी 350V आणि 380V आहेत. दरम्यान, काही काळापूर्वी एक लीक समोर आली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की महिंद्रा XUV 300 ला इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये Mahindra XUV 400 च्या नावाने सादर केली जाऊ शकते.
2027 पर्यंत कंपनी आठ इलेक्ट्रीक वाहनं लाँच करणार असल्याची माहिती कंपनीनं नुकतीच शेअर केली होती. त्यापैकी चार गाड्या या कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांचंच इलेक्ट्रीक व्हर्जन असेल.
तर 2025च्या सुरूवातीला कंपनी चार नव्या इलेक्ट्रीक कार्सही लाँच करणार आहे. याशिवाय कंपनीनं आपल्या इलेक्ट्रीक वाहनांना एका निराळ्या सब ब्रँडमध्ये बदलण्याची आपली योजनाही शेअर केली होती.