insurence cost will increase if the traffic chalans not paid?
वाहतूक नियम मोडल्याचे चलन न भरल्यास विम्याची रक्कम वाढणार? By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:26 AM2019-09-09T09:26:20+5:302019-09-09T09:33:08+5:30Join usJoin usNext वाहतुकीचे नियम मोडल्यास नव्या नियमांनुसार दहापट दंड आकारला जाणार आहे. याची अंमलबजावणी काही राज्यांमध्ये करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र अद्याप दूर आहे. नियम मोडल्यानंतर वाहन चालकाला ऑनलाईन पावती पाठविली जाणार आहे. मात्र, अनेकजण हा दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा महाभागांवर कारवाईची क्लुप्ती शोधण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून ऑनलाईन दंड आकारला जात आहे. हा दंड तब्बल लाखाच्या आसपासही जात आहे. यामुळे दंड न भरला तर तो आरटीओकडे वाहनावर जमा होत आहे. ऑनलाईन पाहिल्यास हा दंड दिसतो. मात्र, तो वसुलण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आता हा दंड वसुलण्यासाठी इन्शुरन्सचा आधार घेण्यात येत आहे. दंड न भरणारा वाहनचालक वाहनाचा इन्शुरन्स काढायला गेल्यास विम्याच्या रक्कमेत वाढ होणार आहे. भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) ने या प्रयोग दिल्लीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो देशभरात लागू करण्यात येणार आहे. दंडाची न भरलेली रक्कम आणि विम्याची रक्कम मोजल्यानंतरच विमा काढता येणार आहे. यामुळे दंडाची रक्कम न भरल्यास विमा काढता येणार नाही. नवीन नियम लागू झाल्यानंतर इन्शुरन्स आणि पीयुसीसाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या तीन दिवसांत तब्बल 84 हजार पीयुसी प्रमाणपत्रे देण्यात आली. टॅग्स :वाहतूक पोलीसtraffic police