झालं... टाटाने नवी नेक्सॉन ईव्ही एवढ्या कमी किंमतीत लाँच केली; हायटेक फिचर्स पाहून भलेभले गार होतील... By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:14 PM 2023-09-14T17:14:17+5:30 2023-09-14T17:18:47+5:30
New Tata Nexon EV Price and Features in Marathi: नवे फेसलिफ्ट मॉडेलने या एसयुव्ही कारचा चेहरा मोहराच बदलला आहे. एकदम हायटेक अशी कार टाटाने रस्त्यावर उतरविली आहे. टाटा मोटर्सने आज ईव्ही बाजारात धमाका केला आहे. Tata Nexon EV सर्वांनाच माहिती होती, परंतू नवे फेसलिफ्ट मॉडेलने या एसयुव्ही कारचा चेहरा मोहराच बदलला आहे. एकदम हायटेक अशी कार टाटाने रस्त्यावर उतरविली आहे. कारच्या एक्स्टीरिअर आणि इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच हायफाय कारमध्ये जी फिचर्स असतात ती टाटाने या कारमध्ये दिली आहेत. टाटाने नेक्सॉन ईव्हीला दोन बॅटरी पॅकमध्ये लाँच केले आहे. चला जाणून घेऊया फिचर्स आणि किंमत...
Tata Nexon Electric च्या लुकमध्ये खूपच बदल करण्यात आला आहे. पुढे वेलकम आणि गुडबाय एलईडी लाईट, आतमध्ये दोन मोठ्या स्क्रीन, कार चार्ज करतेवेळी युट्यूब, हॉटस्टार, नेटफ्लिक्स आदी सारे काही तुम्हाला पाहता येणार आहे. या कारमध्ये कारते दुसरी कार किंवा उकरणे चार्ज करण्याची सोय देण्यात आली आहे.
नेक्सॉन ईव्हीची सुरुवातीची किंमत 14.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही मिडरेंज कार आहे. तर दुसरे हाय रेंज कारची किंमत १९.९४ लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. कारच्या सेंटर कन्सोलमध्ये रोटरी ड्रायव्हिंग मोड सिलेक्टर देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही रेडिओ बटण फिरवून तुमचा ड्रायव्हिंग मोड निवडू शकता.
12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम वरील मॅप तुम्ही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये देखील पाहू शकणार आहात. मिड-रेंज (MR) मध्ये 30kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 325 किलोमीटरपर्यंतची रेंज देतो. लाँग रेंज (LR) मध्ये, कंपनीने पूर्वीप्रमाणेच 40.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 465 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.
सिनेमा, वेब सिरीज किंवा गाणी ऐकण्यासाठी जेबीएलची साऊंड सिस्टिम पूर्वीच्या तुलनेत वाढविण्यात आली आहे. आता दोन वुफर जास्त देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. इंडिकेटर सुरु केल्यावर ब्लाईंड स्पॉट कॅमेरा व्ह्यू देण्यात आला आहे. 360-डिग्री कैमरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जर, सनरुफ, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एयर प्यूरिफायर, क्रूझ कंट्रोल आदी गोष्टी देखील देण्यात आल्या आहेत.