It started to feel cold ... take care of the car ...!
थंडी जाणवायला लागली...गाडीची अशी घ्या काळजी...! By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:05 PM2018-12-12T18:05:32+5:302018-12-12T18:09:02+5:30Join usJoin usNext हिवाळ्यामध्ये कारची विशेष काळजी घेण्याची गरज असते. न केल्यास गाडी सुरु करण्यापासून ते चालविण्यापर्यंत समस्या येऊ शकतात. कमी तापमान आणि दाट धुक्यामध्ये गाडी चालवायची असल्यास आधी ही काळजी घ्या. थंडीच्या काळात सकाळी गाडी सुरु करताना समस्या येतात. जर गाडीची सर्व्हिस काही महिन्यांनी करायची असल्यास ती आताच करून घ्यावी. गाडीचे इंजिन ऑईल तपासावे. कमी असेल तर भरावे अन्यथा खराब असेल तर बदलावे. याशिवाय इंजिनचा बेल्ट आणि हॉजही तपासावा. ऑईल फिल्टरही तपासावा. कारची एक्झॉस्ट सिस्टिम तपासावी. कार्बन मोनॉक्साइड किंवा कार्बन डायॉक्साइड लीक होऊन कारमध्ये जात असेल तर ते प्रवासावेळी धोकादायक आहे. थंडीचा सर्वाधिक परिणाम बॅटरीवर जाणवतो. जर बॅटरी तीन वर्षांपेक्षा जुनी असेल तर मॅकेनिककडून एका तपासून घ्या. टर्मिनलवर जर पांढरी- पिवळी पावडर जमा झाली असल्यास ती ब्रशने साफ करावी. थंडीमध्य़े रस्त्यावर दाट धुके असते. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दृष्यमानता कमी होते. यासाठी कारला फॉगलँप नसल्यास बसवून घ्यावेत. फॉगलँप हे मुख्य़त: पांढऱ्या रंगाचे असावेत. शिवाय हेडलाईटही तपासून घ्याव्यात. थंडीमध्ये दवामुळे रस्ते ओले झालेले असतात. यामुळे गाडीचे टायर झिजलेले असल्यास ते वेळीच बदलावेत. कारण ओल्या रस्त्यावर गाडी घसरण्याची शक्यता जास्त असते. शिवाय टायरमधील हवेचा दाब तपासावा. कारण या थंडीत रबर थोडा आकुंचन पावतो. थंडीमध्ये गाडी बाहेर उभी असल्यास दव त्यावर पडलेला असतो. उन पडल्यावर दव उडण्याची प्रक्रिया सुरु होते. यावेळी गाडीचा रंगही उडण्याची शक्यता आहे. यासाठी गाडीवर कव्हर टाकावे. इंधन टाकी पूर्ण भरावी. कारण फ्युअल पंपमध्ये थंडीमुळे पाणी जमा होते. मात्र, योग्य प्रमाणात इंधन ठेवल्यास पंपमध्ये तापमान नीट राखले जाते. टॅग्स :वाहनकारAutomobilecar