जॅग्वारने सादर केली आपली पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत! By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 12:12 PM 2018-10-05T12:12:35+5:30 2018-10-05T12:36:10+5:30
एसयूव्हीच्या जगातील प्रसिद्ध कंपनी जॅग्वारने पॅरिस मोटार शोमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही I-Pace ही कार सादर केली आहे. कंपनीने या एसयूव्हीसोबत इलेक्ट्रिक कारच्या जगात पहिलं पाऊल ठेवलं आहे. ही कार याआधीही ही कार वेगवेगळ्या मोटर शोजमध्ये सादर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक कारची खासियत...(All Image Credit : NBT)
क्विक चार्ज कॅपेबिलिटी - क्विक चार्च कॅपेबिलिटीसोबतच या कारमध्ये जास्तीत जास्त स्पेस देण्यात आली आहे.
स्पीडबाबतही दमदार - इलेक्ट्रिक कार असूनही ही कार स्पीडबाबत इतर एसयूव्ही कार्सना बरोबरची टक्कर देते. १०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावण्यासाठी या कारला केवळ ५ सेकंद वेळ लागतो. एकदा चार्च केल्यानंतर ही कार ४५० किमीपर्यंत धावू शकते.
फीचर्स - कंपनीने या कारमध्ये एलइडी हेडलॅम्प आणि हमीकॉम्ब पॅटर्नच्या ग्रीलसोबतच सेंट्रल एअरडॅम दिलं आहे. तसेच या कारमध्ये मोठा टचस्क्रीन डिस्प्ले सुद्धा दिला आहे. ड्रायव्हरच्या सोयीसाठी असे करण्यात आले आहे.
पॉवरबाबतही दमदार - जॅग्वार I-Pace मध्ये दोन परमनंट मॅग्नेट असलेल्या मोटर लावण्यात आल्या आहेत. या मोटर ३९५ बीएचपीची पॉवर आणि ७०० न्यूटनचा टॉर्क जनरेट करतात.
बॅटरीची खासियत - कंपनी ने I-Pace मध्ये 90 kwh लीथियम इऑन बॅटरी दिली आहे. ही ४५ मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होते.