70 पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स! फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी आली नवीन SUV, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:48 PM2024-10-21T18:48:48+5:302024-10-21T18:54:51+5:30

भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरशी असेल.

Jeep Meridian launches in India :अमेरिकन कार निर्माता कंपनी जीपने आपली प्रसिद्ध एसयूव्ही जीप मेरिडियन (Jeep Meridian)चे अपग्रेडेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. कंपनीने या SUV मध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त अपडेट्स दिले आहेत. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 24.99 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरसारख्या गाड्यांशी असेल.

कशी आहे नवीन जीप मेरिडियन ? कंपनीने या नवीन Meridian मध्ये 5-सीटर आणि 7-सीटर पर्याय दिले आहेत. ही SUV लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड प्लस, लिमिटेड (ओ) आणि ओवरलँड अशा चार प्रकारांमध्ये लॉन्च केली आआहे. कंपनीने आजपासून या एसयूव्हीचे अधिकृत बुकिंगही सुरू केले असून, हे नवीन मॉडेल देशभरातील कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, जीप मेरिडियन पूर्वीप्रमाणेच आहे. यात स्लॅट ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, डेटाइम रनिंग लाइट्स, 18-इंच अलॉय व्हील आणि स्लीक टेल लॅम्प्स आहेत. केबिनमध्ये लेदर सीट, डॅशबोर्डवर आणि स्यूडे ॲक्सेंटसह आर्मरेस्ट आणि कॉपर स्टिचिंगवर प्रीमियम मटेरियल वापरले आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्स : या नवीन एसयूव्हीमध्ये कंपनीने 2.0 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. विशेष बाब म्हणजे, ही SUV टू-व्हील ड्राइव्ह (4X2) आणि फोर व्हील ड्राइव्ह (4X4) दोन्ही सेटअपसह उपलब्ध आहे.

किंमत: लॉन्गिट्यूड, (5-सीटर) ₹ 24.99 लाख, लॉन्गिट्यूड प्लस 27.5 लाख, लिमिटेड (ओ) 30.49 लाख, ओवरलँड 36.49 लाख रुपयांना उपलब्ध आहे.

कॅबिन फिचर्स: यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.1-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 10.2-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, वायरलेस चार्जर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळतील.

सेफ्टी फीचर्सबद्दल कंपनीने दावा केला आहे की, नवीन मेरिडियन 70 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह येत आहे. त्याच्या टॉप-स्पेक ओव्हरलँड ट्रिममध्ये ADAS लेव्हल-2 सूट आणि अधिक कनेक्टिव्हिटी फिचर्ससह इतर अनेक नवीन प्रगत फिचर्स मिळतात. ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग विथ कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि लेन कीप असिस्ट यांसारखी फिचर्स मिळतील.

670 लीटर बूट स्पेस: जीपचा दावा आहे की नवीन 5-सीटर व्हेरियंटमध्ये 670 लीटरची बूट स्पेस आहे, तर 7-सीटर व्हेरियंटमध्ये दुसरे सीट फोल्ड केल्यावर 824 लीटरपर्यंत बूट स्पेस आहे. सर्व सीट्स वापरात असताना, 7-सीटर व्हेरिएंट 170 लीटरची बूट स्पेस मिळते.