Kia ची जबरदस्त ऑफर! केवळ १ लाख रुपये भरा अन् लेटेस्ट SUV घरी न्या; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:29 AM2022-02-20T11:29:47+5:302022-02-20T11:37:33+5:30

किआ मोर्टसची नवीन कार मारुती अर्टिगाला जोरदार टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.

भारतात अनेकविध कंपन्या आपली नवनवीन उत्पादने सादर करताना पाहायला मिळत आहे. किआ कंपनीने भारतात एन्ट्री केल्यानंतर अल्पावधीतच जम बसवल्याचे दिसून आले. मारुती सुझुकीच्या अर्टिगा आणि या सेगमेंटमधील अन्य स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी Kia मोटर्सने आपली नवीन ७ सीटर SUV लॉंच केली आहे.

किआ मोटर्सने अलीकडेच भारतात आपली नवीन एसयूव्ही किआ कारन्स लाँच केली आहे. ६ आणि ७ सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. किआ कारन्सला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फक्त ८.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.

Seltos, Carnival आणि Sonnet नंतर Kia ची ही भारतातील चौथी कार आहे. जवळपास एका महिन्यात कंपनीला आत्तापर्यंत १९ हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. कारेन्स या कारची निर्मिती अनंतपूर येथील फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. ही कार भारतातच तयार करून परदेशात निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.

Kia Carens एसयूव्हीचे बेस मॉडल किआ कारन्स प्रीमियम पेट्रोल फक्त १ लाख रुपये डाउनपेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. यात १०.२५ इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि सनरूफ देण्यात आले आहे.

Kia Carens मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने यात व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर, डाउनहिल ब्रेकिंग कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ब्रेक असिस्ट यांचाही समावेश आहे. Kia ने ही कार सहा सीटर आणि सात सीटर या ऑप्शनमध्ये लाँच केली आहे.

Kia Carens पेट्रोल व्हर्जन १६.५ kmpl आणि डिझेल व्हर्जन २१.३ kmpl मायलेज देते. Kia Carens प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या पाच ट्रिम व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसंच यामध्ये सीटिंग ऑप्शन्सही उपलब्ध आहेत.

भारतात किआ कारन्सचे बेस मॉडल कारन्स प्रीमियम पेट्रोलची एक्स शोरूम किंमत ८.९९ लाख रुपये आहे. ऑन रोड किंमत १०.६ लाख रुपये आहे. तुमची फॅमिली जर ६ ते ७ लोकांची असेल तर तुमच्यासाठी ही एसयूव्ही चांगली आहे.

Kia Carens या एसयूव्हीच्या किंमतीवर १० टक्के म्हणजेच १ लाख रुपये डाउन पेमेंट करून फायनान्स करू शकता. यानंतर तुम्हाला ५ वर्षासाठी या एसयूव्हीवर ९.०६ लाख रुपये लोन मिळेल. यावर व्याज ९ टक्के राहिल्यास तुम्हाला ५ वर्षासाठी ईएमआय म्हणून दरमहिना १८ हजार ८११ रुपये भरावे लागतील. ५ वर्षासाठी किआला फायनान्स केल्यास २.२ लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

Kia Carens तीन इंजिन ऑप्शन्ससह येते. यामध्ये 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन यांचा समावेश आहे.