सहा महिन्यांत Kia च्या १ लाख कार्सची विक्री; ग्राहकांची सर्वाधिक पसंती 'या' कारला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:31 PM2021-08-03T13:31:31+5:302021-08-03T13:39:27+5:30

Kia Motors India : सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी जुलै महिन्यात विक्री झालेल्या गाड्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. Kia India ला जुलै महिन्यात झाला फायदा.

सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी जुलै महिन्यातील आपल्या कार्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यादरम्यान जुलै २०२१ मध्ये Kia India च्या आपल्या वार्षित विक्रीमध्ये ७६ टक्क्यांची वाढ झाली.

कंपनीनं गेल्या महिन्यात १५,०१६ गाड्यांची विक्री केली आहे. तसंच कॅलेंडर वर्ष २०२१ मध्ये कंपनीनं १ लाख कार्सच्या विक्रीची संख्याही पार केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

दरम्यान, किया मोटर्सनं आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फायनॅन्स स्कीमही लाँच केल्या आहेत.

जुलै महिन्यात विक्री झालेल्या गाड्यांपैकी सर्वाधिक विक्री ही सब-कॉम्पॅक एसयुव्ही Kia Sonet ची होती. गेल्या महिन्यात या कारच्या ७,६५ युनिट्सची विक्री झाली आहे.

याप्रमाणे कंपनीनं मीड साईज एसयूव्ही Kia Seltos लाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. जुलै महिन्यात किआ सेल्टोसच्या ६,९८३ युनिट्सची विक्री झाली. तर Carnival MPV च्या ३२८ युनिट्सची विक्री झाली.

दरम्यान, दक्षिण कोरियाची कंपनी कियानं यापूर्वीच आपण २०२२ मध्ये भारतात आपली चौथी कार लाँच करणार असल्याची घोषणा केली होती.

ही सेल्टोसच्या प्लॅटफॉर्मवर आधारित एक कॉम्पॅक्ट MPV असू शकते. Kia KY कोडनेम असलेल्या या कारची स्पर्धा मारूती अर्टिगा, महिंद्रा मराझो आणि ह्युदाई, तसंच एमच्या आगामी कॉम्पॅक्ट एमपीव्हीशी असणार आहे.

यामध्ये सेल्टोसपासून इन्सपायर्ज डिझाईन, फीचर्स आणि इंजिन असण्याची शक्यता आहे. कियाची कॉम्पॅक्ट एमपीव्ही ६ किंवा ७ सीट लेआऊटसह लाँच केली जाऊ शकते.

यांची लांबी जवळपास ४.५ मीटर असू शकते. तसंच ही सेल्टोस प्रमाणेच असेल. भारतात ३ रॉ एमपीव्हीचं उत्पादन अनंतपुर येथील प्रकल्पात केलं जाणार आहे.

कंपनी ही कार इंडोनेशियासह अन्य बाजारपेठेतही निर्यात करू शकते. कंपनीचं वर्षाला ५० हजार युनिट्स विक्रीचं लक्ष्य आहे.