Maruti च्या स्वस्त ७ सीटर कारची जबरदस्त विक्री; ७.५ लाख लोकांनी केली खरेदी, ११ हजारांत बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 08:03 PM2022-04-08T20:03:51+5:302022-04-08T20:08:23+5:30

या कारला मिळतेय ग्राहकांची मोठी पसंती. ११ हजारांत करता येणार नवं व्हर्जन बुक.

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) ही देशातील लोकप्रिय MPV कार आहे. सध्या या कारच्या 7.5 लाख युनिट्सची विक्री झाली असून यावरून तुम्ही त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता.

Ertiga MPV 2012 मध्ये सादर करण्यात आली होती. म्हणजेच 10 वर्षांत कारने हा ऐतिहासिक आकडा गाठला. आता कंपनी आपले फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. याचं बुकिंग ११ हजार रुपयांमध्ये सुरू करण्यात आलंय.

गेल्या चार वर्षआंमध्ये अर्टिगाला मोठं यश मिळआलं आहे या सेगमेंटमध्ये ही लीडर ठरली आहे अशी प्रतिक्रिया मारुती सुझुकीकडून देण्यात आली. कंपनीनं ही कार पेट्रोल, डिझेलव्यतिरिक्त सीएनजीमध्येही लाँच केली होती.

दरम्यान, बीएस ६ आल्यानंतर कंपनीनं डिझेल व्हर्जन बंद केलं होतं. सध्या या सेगमेंटमध्ये मिळाणारी ही एकमेव एमपीव्ही आहे, जी सीएनजी व्हेरिअमध्येही येते.

मारुती सुझुकी अर्टिगाने 2015-16 पर्यंत सुरुवातीच्या 2.5 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला होता. सुमारे चार वर्षांनंतर, कंपनीने आणखी 5.5 लाख युनिट्सची विक्री केली. लाँचच्या वेळी, ही कार Toyota Innova परवडणारा पर्याय म्हणून आणली गेली होती.

नवीन Ertiga पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. नेक्स्ट जनरेशन अर्टिगा स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येईल आणि यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.

नवीन एर्टिगा नवीन काळातील फीचर्स, अपग्रेडेड पॉवरट्रेन आणि अॅडव्हान्स्ड 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. नवीन मॉडेल सीएनजी पर्यायासह उपलब्ध असेल, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली.