Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:05 PM 2022-08-22T21:05:52+5:30 2022-08-22T21:19:37+5:30
दुचाकीच्या टायरमध्ये हवेचा दाब (Air Pressure) कमी असल्याने आणि अधिक असल्यानेही नुकसान होऊ शकते. यामुळे दुचाकीच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी, हे प्रत्येक दुचाकी चालकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दुचाकीने आपल्याला रास्त्यातच धोका देऊ नये, यासाठी आपण तिची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दुचाकीसंदर्भातील ज्या तीन गोष्टींकडे आपले नेहमीच लक्ष असायला हवे, त्यांतील एक म्हणजे, टायर प्रेशर. दुचाकीच्या टायरमधील हवेचा केवळ मायलेजवरच फरक पडत नाही, तर यामुळे अपघातही होऊ शकतात.
दुचाकीच्या टायरमध्ये हवेचा दाब (Air Pressure) कमी असल्याने आणि अधिक असल्यानेही नुकसान होऊ शकते. यामुळे दुचाकीच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी, हे प्रत्येक दुचाकी चालकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही आपल्याला याच संदर्भात माहिती देत आहोत.
खरे तर, दुचाकी अथवा बाईकच्या टायरमध्ये किती हवा असायला हवी, हे वेगवेगळ्या कंडिशन्सवर अवलंबून असते. पहली कंडिशन म्हणजे आपण कुठल्या ठिकाणी ड्रायव्हिंग करत आहात? दुसरे म्हणजे, आपण किती वजन घेऊन बाईक चालवत आहात?
याशिवाय बाईकच्या टायर साईजवरही एअर प्रेशर अवलंबून असते. जर आपल्या बाईकचे टायर आणि ट्यूबची क्वालिटी चांगली नसेल, तर अधिक प्रेशरने ट्यूब फाटण्याची शक्यता असते.
दुचाकी अथवा बाईकच्या टायरमध्ये किती हवा ठेवायला हवी? - अधिकांश बाइक्सच्या टायरमध्ये एक सरासही हवा निश्चित पणे ठेवायला हवी. साधारणपणे बाईकच्या पुढील टायरमध्ये 22 PSI ते 29 PSI पर्यंत हवेचा दाब असायला हवा. याच प्रकारे मागच्या टायरमध्ये 30 PSI ते 35 PSI पर्यंत हवेचा दाब असायला हवा. मागच्या टायरवर अधिक लोड असल्याने त्यात अधिक हवा ठेवली जाते.
महत्वाचे म्हणजे, वेगवेगळ्या परिस्थितीच्या अनुशंगाने बाईकच्या टायरमधील एअर प्रेशर 2 ते 4 अंकांनी कमी-अधिक होऊ शकते. जर आपल्याला अजूनही आपल्या बाईकच्या टायरमधील हवेसंदर्भात कन्फ्यूजन असेल, तर आपण बाईकसोबत मिळणाऱ्या मॅन्यूअल बुकमध्येही हे चेक करू शखता.