'या' आहेत जबदस्त मायलेज देणाऱ्या टॉप ५ कार; बाइकपेक्षाही कमी खर्च By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:24 PM 2021-03-09T15:24:18+5:30 2021-03-09T15:28:52+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात कार आणि बाइकची विक्री वाढल्याचे दिसत आहे. कारचा खर्च अधिक असतो, म्हणून अनेक जण बाइकला पसंती देतात. असे असले तरी जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप ५ अशा कार आहेत, ज्यांचा इंधन खर्च बाइकपेक्षाही कमी येऊ शकतो. या कारचे मायलेज पाहिल्यास बाइक विसरून जायला होईल, असे सांगितले जात आहे. देशात दिवसेंदिवस इंधनदरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्यानी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे काही शहरात भाव शंभरीपार झाले आहेत.
पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमती वाढवल्यामुळे सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. तर, दुसरीकडे मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेतला, तर आगामी काही काळ सर्व सामान्यांसाठी कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराला पर्याय म्हणून CNG आणि इलेक्ट्रिक कारना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये CNG पंप बसवून पेट्रोल आणि डिझेलला एक सशक्त पर्याय देण्यावर सरकार भर देत आहे.
कोरोना संकटानंतर हळूहळू जग सावरत असताना ऑटोमोबाइल क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात कार आणि बाइकची विक्री वाढल्याचे दिसत आहे. कारचा खर्च अधिक असतो, म्हणून अनेक जण बाइकला पसंती देतात.
असे असले तरी जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप ५ अशा कार आहेत, ज्यांचा इंधन खर्च बाइकपेक्षाही कमी येऊ शकेल. विविध कंपन्यांनी सादर केलेल्या या कार CNG वर चालणाऱ्या आहेत. या कारचे मायलेज पाहिल्यास बाइक विसरून जायला होईल, असे सांगितले जात आहे.
मारुति सुझुकीची WagonR ही देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कारमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. WagonR च्या CNG मॉडेलची किंमत ७ लाख रुपये आहे. मात्र, एक किलो गॅसमध्ये ही कार ३२ कि.मी.चे मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दिल्ली ते जयपूर हे अंतर केवळ ४७० रुपयांमध्ये कापले जाऊ शकते, असे सांगितले जाते.
सेडान श्रेणीतील कारमध्ये ह्युंदाई मोटर्सच्या ऑरा कारचा क्रमांक वरचा लागतो. ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ही कार २८ कि.मी. मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
देशातील मध्यमवर्गीयांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेली Alto ही कारदेखील CNG पर्यायात उपलब्ध आहे. ऑल्टो कार एक किलो CNG गॅसमध्ये ३१ कि.मी. मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जवळच्या ट्रीपसाठी ही कार उत्तम असल्याचे सांगितले जाते.
हॅचबॅक प्रकारात लोकप्रिय असलेल्या ह्युंदाय सेंट्रो ही कारदेखील CNG पर्यायात उपलब्ध आहे. एक किलो गॅसमध्ये ही गाडी ३० कि.मी. मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आले आहे. या श्रेणीत मारुती सुझुकीच्या WagonR आणि Alto कारशी सेंट्रोची थेट स्पर्धा असल्याचे सांगितले जाते.
ऑनलाइन कम्पेरिझन करणाऱ्या सर्व वेबसाइटवर मारुती सुझुकी अर्टिगाच्या CNG मॉडेलला सर्वांत जास्त रेटिंग देण्यात आले आहे. MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार म्हणून अर्टिगाचे नाव घेतले जाते. एक किलो CNG गॅसमध्ये ही कार २६ कि.मी.चे अंतर कापते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक शहरांमध्ये सुमारे ५० कि.मी.चे मायलेज देतात. तर, पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या कार शहरांमध्ये १५ ते १७ कि.मी.चे मायलेज देतात. मात्र, CNG कारचे मायलेज अधिक असते, असे सांगितले जाते.