Hydrogen Cars Vs Electric Cars: इलेक्ट्रिक कारपेक्षा हायड्रोजन कार चांगली आहे का? जाणून घ्या, वैशिष्ट्ये आणि फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 05:07 PM 2022-04-07T17:07:41+5:30 2022-04-07T17:12:34+5:30
Hydrogen Cars Vs Electric Cars: हे आपल्या देशाचे भविष्य आहे, असे नितीन गडकरी यांनी टोयोटाच्या हायड्रोजन कारमधून प्रवास केल्यानंतर म्हटले होते. पाहा, डिटेल्स... आताच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सार्वकालिक उच्चांकावर आहेत. देशातील अनेकविध शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलही शंभरी पार गेले आहे. यामुळे महागाईत वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागत आहे.
पारंपरिक इंधनाच्या वाढत्या दरांमुळे तसेच प्रदुषणात मोठी वाढ होत असल्याने जगभरातील कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मितीचा पर्याय शोधला. भविष्य काळात बहुतांश कंपन्या आपल्या सर्व कार इलेक्ट्रिक प्रकारात सादर करणाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. (Hydrogen Cars Vs Electric Cars)
पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिकला पर्याय म्हणून आता हायड्रोजन कार उत्पादनाचा विचार पुढे येऊ लागला आहे. यामुळे ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, अलीकडेच रुजू आणि रुळू लागलेल्या इलेक्ट्रिक कारपेक्षा हायड्रोजन कार चांगली आहे का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. (Electric Cars)
काही दिवसांपूर्वी केद्रींय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा मिराई हायड्रोजन कारमधून प्रवास करत संसदेच्या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली होती. या दरम्यान, स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या कारबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. (Hydrogen Cars)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या हायड्रोजन कारने संसदेत पोहोचले ती टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात आली आहे. टोयोटाने या कारमध्ये अत्याधुनिक फ्यूल सेल बसवला आहे. याद्वारे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे मिश्रण करून वीज निर्माण करेल. त्यातून ही कार धावणार. ही कार धुराऐवजी फक्त पाणी सोडते.
नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, हायड्रो फ्युएल सेलमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ही कार आपल्या देशाचे भविष्य आहे, असेही सांगण्यात आले. जपानी भाषेतील 'मिराई' या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो.
मिराई एक हायड्रोजन फ्यूल सेल कार आहे. यामध्ये तीन हायड्रोजन टँक आणि फ्यूल सेल लावण्यात आले आहेत. कारसाठी एक लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रीक मोटरदेखील आहे. तीन हायड्रोजन टँकदेखील आहे. यामध्ये 5.6 किलोग्रॅम हायड्रोजनची क्षमता आहे.
याचाच अर्थ ही कार 600 किमी अंतराचा पल्ला गाठू शकते. मात्र, ही कार 1000 किमी अंतरापेक्षाही अधिक अंतर कापू शकते. या कारमुळे प्रदूषण होत नाही. यामध्ये टेलटाइप उत्सर्जन आहेत. हायड्रोजन कार अधिक चांगली असल्याचे म्हटले जाते.
एक इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याच्या तुलनेत हायड्रोजन भरण्यासाठी फार कमी वेळ लागतो. विशेष म्हणजे हायड्रोजन कारही इलेक्ट्रिक कारपेक्षा अधिक अंतरापर्यंत प्रवास करू शकते. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वीज उत्पादन करण्यासाठी कार्बन उत्सर्जन होते. तर हायड्रोजन फ्यूल कार चालवण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करण्यासाठी कार्बन उत्सर्जन शून्य होते.