Driving License तयार करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही; घरबसल्या होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 11:28 AM2021-05-01T11:28:44+5:302021-05-01T11:38:23+5:30

Oneline Driving License : पाहा कसा करता येईल अर्ज

सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत अनेक कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमचा Driving License तयार करायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

आता तुम्हाला Driving License घरबसल्याही बनवता येणं शक्य आहे.

यासाठी तुम्हाला केवळ ३५० रूपये इतके खर्च अपेक्षित आहे. तसंच बाहेर न जात घरबसल्या तुम्हाला तुमच्या लायसन्सचं कामही करता येईल.

तुम्हाला केवळ या १० स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा Driving License तयार करू शकता.

ऑनलाईन Driving License साठी तुम्हाला परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/ यावर क्लिक करावं लागेल.

यानंतर होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस आणि त्यानंतर ड्रायव्हिंग रिलेटेड सर्व्हिसेसवर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर जे पेज उघडेल त्यावर तुम्ही राहत असलेल्या राज्याचं नाव सिलेक्ट करा.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवं पेज ओपन होईल. त्याठिकाणी असलेल्या अनेक ऑप्शन्सपैकी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन सबमिट असा ऑप्शन दिसेल.

यापूर्वी तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागे. तसंच जी काही माहिती विचारली असेल ते योग्यरित्या तपासून भरावी लागेल.

यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितलं जाईल.

ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि तुमची सही अपलोड करावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला शुल्क भरण्यास सांगितलं जाईल. त्या ठिकाणी योग्यरित्या शुल्क भरण्याची प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

शुल्क भरल्यानंतर तुम्हा शुल्क भरल्याची पावती मिळेल. ती डाऊनलोड करून प्रिंट करा अथवा तुमच्याकडे सांभाळून ठेवा.