635 bhp ची पॉवर अन् 4 सेकंदात 0 ते 100 km चा वेग; लँड रोव्हरची नवीन Defender लॉन्च By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:51 PM 2024-07-03T16:51:19+5:30 2024-07-03T17:01:50+5:30
लँड रोव्हरने आपली नवीन Defender Octa भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. Land Rover Defender Octa : लक्झरी कार उत्पादक कंपनी Land Rover ने आपली नवीन बहुचर्चित कार Defender Octa लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने ही कार 4x4 सेटअपसह लॉन्च केली असून, या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 319 मिमी आहे.
इंजन- कंपनीने या नवीन कारमध्ये 4.4 लीटर V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 635 bhp च्या कमाल पॉवरसह 750 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार अवघ्या 4 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडते.
डिझाईन- लँड रोव्हरची ही नवीन कार कंपनीने आधुनिक पद्धतीने तयार केली आहे. या कारमध्ये अंडरबॉडी प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार 1 मीटर खोल पाण्यातही सहज धावू शकते. कंपनीने या कारला सर्वोत्तम ऑफरोड कार म्हणून लॉन्च केले आहे. या कारमध्ये 20 इंच फोर्ज्ड अलॉय व्हील्स मिळतात, ज्याच्या मदतीने अगदी सहजपणे डोंगरावरही चढता येते.
फीचर्स- या नवीन ऑफरोड कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. कारच्या सी पिलरवर नवीन डिझाइन आणि डायमंड ऑक्टा बॅज आहे. कारचे सीट थ्रीडी निटने बनलेले आहेत, जे अतिशय वेगळे दिसतात. याशिवाय या ऑफरोड कारमध्ये उत्कृष्ट हेडरेस्ट, 11.4-इंच इंफोटेनमेंट स्क्रीनसह सेंटर कन्सोलदेखील मिळतो. कंपनीने पेट्रा कॉपर आणि फारो ग्रीन, अशा कलरसह ही कार लॉन्च केली आहे.
किंमत- लँड रोव्हरने भारतात आपला नवीन डिफेंडर ऑक्टा 2.65 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च केली आहे. या कारच्या एडिशन वनची एक्स-शोरूम किंमत 2.85 कोटी रुपये असेल. 31 जुलै 2024 पासून कारचे बुकिंग सुरू होईल, तर वर्षाच्या अखेरीस डिफेंडर ऑक्टाची डिलिव्हरी मिळेल.