लुनाच जणू! केवळ 20 पैशांमध्ये 1 किमी धावणार; दिल्ली आयआयटीच्या पोरांना लय भारी 'Hope' By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:27 PM 2021-03-29T13:27:03+5:30 2021-03-29T16:54:26+5:30
Electric scooter Launch by Delhi IIT Student, Geliose Mobility Hope: दिल्लीच्या या विद्यार्थ्यांनी एक स्टार्टअप सुरु केली आहे. Geliose Mobility (गेलियोस मोबिलिटी) नावाची ही स्टार्टअप आहे. या कंपनीने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव Hope (होप) असे ठेवले आहे. पॅडल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर...जाणून घ्या किंमत आणि फिचर्स... हवा प्रदूषण वाढत आहे. याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीतही मोठी वाढ झालेली आहे. यामुळे अनेकजण आता परवडेना म्हणून ईलेक्ट्रीक स्कूटर किंवा अन्य पर्याय़ांकडे वळू लागले आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक भन्नाट स्कूटर बनविली आहे. (The vehicle falls under exemption category with a top speed of 25 km/hr and does not require driving license or registration for driving on the road.)
दिल्लीच्या या विद्यार्थ्यांनी एक स्टार्टअप सुरु केली आहे. Geliose Mobility (गेलियोस मोबिलिटी) नावाची ही स्टार्टअप आहे. या कंपनीने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव Hope (होप) असे ठेवले आहे.
य़ा स्कूटरची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात बुकिंग सुरु करण्य़ात आले आहे. महत्वाचे म्हणजे या स्कूटरचा लूक एवढा आकर्षक आहे की पाहताच क्षणी ती स्कूटर नजरेत भरेल अशी आहे.
चालविण्यासाठी ही इलेक्ट्रीक स्कूटर खूप स्वस्त आहे. Geliose Hope 20 पैशांमध्ये 1 किमी धावते. (Geliose Mobility, an IIT Delhi incubated startup, has launched ‘HOPE’, an electric scooter. With running cost around 20 Paisa/km)
बॅटरी चार्जिंग Geliose Hope ला एक पोर्टेबल चार्जर आणि एक पोर्टेबल ली आयन बॅटरी पॅक मिळते. ते घरी नेऊन चार्ज करता येते. होपची बॅटरी चार तासात पूर्णपणे चार्ज होते.
महत्वाचे म्हणजे ही बॅटरी घरातील सामान्य सॉकेटद्वारे चार्ज करता येते. यामुळे या स्कूटरसाठी पार्किंगमध्ये चार्जर लावण्य़ाची गरज पडणार नाही.
रेंज आपल्या यायच्या जायच्या गरजेनुसार ही स्कूटर दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. क्षमतेनुसार बॅटरी 50 आणि 75 किमीची रेंज देते.
लायसनची गरज नाही... या स्कूटरचा टॉप स्पीड हा 25 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. यामुळे ही स्कूटर एक लो स्पीड व्हेईकल प्रकारात मोडते. यामुळे ही स्कूटर चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लायसनची गरज नाही. तसेच रजिस्ट्रेशनचीही गरज नाही.
फीचर्स... या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये एक पॅडल असिस्ट देण्य़ात आले आहे. या स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज वाढविण्यासाठी याचा वापर करता येईल. एवढेच नाही तर रिव्हर्स पार्किंग सेन्सरही देण्यात आला आहे.
दोन्ही चाकांना टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन देण्यात आले आहे. तसेच ड्रम ब्रेकही देण्यात आले आहेत. एलईडी लाईटसह फुल डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.