Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:13 PM 2021-09-14T14:13:34+5:30 2021-09-14T14:20:38+5:30
Ather 450 Plus price slashed: एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ओला, सिंपल वनच्या इलेक्ट्रीक स्कूटरमुळे दोन वर्षांपासून भारतीय बाजारात असलेल्या एथरला घाम फुटला आहे. या दोन्ही कंपन्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून एथरने त्या येण्याआधीच आपल्या स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. खरेतर महाराष्ट्राने दिलेल्या सबसिडीमुळे ही किंमत कमी झाली आहे. (Ather 450+ price reduced in this state, is lowest in India after EV subsidy.)
एथरने Ather 450 Plus इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत तब्बल 24,000 रुपयांची कपात केली आहे. यामुळे या स्कूटरची किंमत महाराष्ट्रात 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. राज्याने देऊ केलेली सबसिडी आणि कंपनीची नवी किंमत विचारात घेता या स्कूटरची किंमत 24000 रुपयांनी कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ईव्ही सबसिडी लाईव्ह होत आहे. यामुळे 450+ ची किंमत 24 हजारांनी कमी होणार आहे. आता ही स्कूटर महाराष्ट्रात 1.03 लाख रुपयांना मिळणार आहे.
याचा अर्थ एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ओला, सिंपल वनच्या तुलनेत या किंमती कमी आहेत. मेहता यांनी या कंपन्यांचे नाव न घेता म्हटले की, अनेक 125 सीसी स्कूटरच्या किंमतीपेक्षा ही किंमत कमी आहे.
FAME II विधेयक आल्यानंतर एथरच्या 450 प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.22 लाख एक्स शोरुम आणि एथर 450X ची किंमत 1.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती. दिल्लीत या किंमती अनुक्रमे 1.28 लाख आणि 1.47 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती.
असे असले तरीदेखील महाराष्ट्रात एथर 450 प्लस ही ओला, सिंपल वन पेक्षा स्वस्त स्कूटर नाहीय. ओलाच्या S1 इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत सबसिडीनंतर 94,999 रुपये एक्स शोरुम आहे.
एथर ओला, सिंपल वनला टक्कर देण्यासाठी एका स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटरवर काम करत आहे. या स्कूटरची किंमत लाखापेक्षा कमी असेल असे कंपनीने गेल्या आठवड्यात सांगितले आहे. मात्र, ही स्कूटर यायला 2023 उजाडेल.