सिंगल चार्जवर दोनदा करा मुंबई-पुणे प्रवास; महिंद्राने लॉन्च केली दमदार EV कार, पाहा फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:20 IST2025-01-08T14:52:50+5:302025-01-08T15:20:05+5:30
Mahindra XEV 9e : येत्या 14 फेब्रुवारीपासून या इलेक्ट्रिक SUV ची बुकिंग सुरू होणार, तर मार्चपर्यंत डिलिव्हरी मिळणार.जाएगी.

Mahindra XEV 9e Pack 3 Price: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Mahindra ने गेल्या वर्षीच्या अखेरीस आपली नवीन इलेक्ट्रिक SUV 'XEV 9E' लॉन्च केली होती. त्यावेळी कंपनीने फक्त त्याच्या बेस व्हेरिएंटची (पॅक 1) किंमत(21.90 लाख रुपयांपासून सुरू) जाहीर केली होती. आता कंपनीने त्याच्या टॉप व्हेरिएंटची (पॅक 3) किंमत जाहीर केली आहे. या दमदार SUV च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 30.50 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. अद्याप, मिड व्हेरिएंट(पॅक 2) ची किंमत समोर आली नाही.
बुकिंग आणि डिलिव्हरी: Mahindra XEV 9e च्या टॉप व्हेरियंटची बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी मार्चच्या सुरुवातीला केली जाईल. ग्राहक कंपनीच्या अधिकृत स्मार्टफोन ॲपद्वारे या इलेक्ट्रिक एसयूव्हीला विशलिस्ट करू शकतात.
कशी आहे Mahindra XEV 9e ? ही नवीन XEV 9e महिंद्राच्या प्रसिद्ध XUV700 पेक्षा मोठी आहे. त्यामुळेच यात तुम्हाला चांगला केबिन स्पेस मिळतो. कंपनीने या नवीन SUV ला एक फ्युचरिस्टिक डिझाइन दिले आहे. यात प्रोजेक्टर हेडलॅम्पसह त्रिकोणी हेडलाइट्स, इनव्हर्टेड L-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), समोरील बाजूस LED लाइट बार, नवीन फ्रंट आणि रियर बंपर, ब्लँक-ऑफ ग्रिल, फ्रंट आणि रीअर स्किड प्लेट्स आणि कॉन्ट्रास्ट रंगाचे आउटसाइट रिअर व्हू मिरर (ORVM) मिळतात.
ड्रायव्हिंग रेंज आणि चार्जिंग: INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित या SUV मध्ये 59kWh आणि 79kWh, अशी दोन बॅटरी पॅक मिळतात. दोन्ही व्हेरिएंटमध्ये एलएफपी (लिथियम-आयरन फॉस्फेट) बॅटरी मिळते. यावर कंपनी लाइफ टाईम वॉरंटी देत आहे. महिंद्राचा दावा आहे की, 79kWh युनिट असलेली कार एका चार्जवर 656 किमीची रेंज देते. पण, ऑन रोड 533-550 किलोमीटरची रेंज मिळेल.
म्हणजेच ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही आरामात मुंबईवरुन नाशिक किंवा पुण्याला जाऊन परत येऊ शकता. परंतू, लोड, रस्त्याची अवस्था आणि ड्रायव्हिंग शैलीमुळे कारच्या ड्रायव्हिंग रेंजवर परिणाम पडू शकतो. विशेष म्हणजे, कंपनीच्या दाव्यानुसार, 175kW DC फास्ट चार्जर वापरुन केवळ 20 मिनिटांत बॅटरी 20 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
या 5 सीटर कारमध्ये 12.3 इंचाच्या 3 वेगवेगळ्या स्क्रीन मिळतात. ही कार महिंद्राच्या Adrenox सॉफ्टवेअरवर चालते. तसेच, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ड्राईव्ह मोड आणि ब्रेक-बाय-वायर टेक्नॉलॉजीचाही यात अतिशय उत्तम वापर करण्यात आला आहे. 650 लीटरची बूट स्पेस आणि 150 लीटरची फ्रंक (समोरच्या बोनेटखाली स्टोरेज स्पेस) तुम्हाला संपूर्ण सामान ठेवण्याची सुविधा देते.
सुरक्षेसाठी या SUV मध्ये लेव्हल 2 ADAS सूट, 7 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरे मिळतात. याशिवाय, पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, डॅशबोर्डवर तीन-स्क्रीन सेटअप, ट्वीक सेंटर कन्सोल, नवीन गियर लीव्हर आणि रोटरी डायल यांसारखे फिचर्स आहेत. सोबतच, ऑटो पार्क फंक्शन, वायरलेस मोबाइल प्रोजेक्शन, 65W USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट, शेड्यूल्ड चार्जिंग फंक्शन आणि केबिन प्री-कूलिंग फंक्शन देखील मिळतात.