देशातील टॉप 5 स्वस्त आणि मस्त CNG कार्स, देतात 32 km चा एव्हरेज; पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 11:08 AM2021-04-01T11:08:32+5:302021-04-01T11:13:22+5:30

Cheapest Cars With CNG and Good Average : आजकाल अनेकांची पसंती CNG कार घेण्याकडेही असते.

Cheapest CNG Cars: पेट्रोल आणि डिझेल कार्सच्या तुलनेत CNG गाड्या या अधिक एव्हरेज देणाऱ्या असताता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता ती कार किती एव्हरेज देते याकडे सर्वांचा कल असतो. परंतु CNG कार्सासाठी त्यात लावण्यात आलेलं सीएनजी किट हे कंपनी फिटेड असणं आवश्यक असतं. कारण बाजारात उपलब्ध असलेली CNG किट्स तुमचा खर्चही वाढवतात आणि धोकादायकही ठरू शकतात.

आजकाल ज्या गाड्या कंपनी फिटेड CNG किट्समध्ये येतात त्यात देशआतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी ही अग्रस्थानी आहे. कंपनीच्या व्हेईकल लाईनमध्ये जवळपास सहा गाड्या या CNG किट्ससह येतात. परंतु आज आपण जाणून घेऊ कोणत्या आहेत टॉप 5 कार्स ज्या सीएनजीसह येतात आणि त्यांच्या किंमतीही तुलनेनं कमी आहेत.

Maruti Alto CNG: मारूती सुझुकीच्या सर्वात स्वस्त हॅचबॅक कार ऑल्टोमध्ये कंपनीनं 800cc क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 40hp पॉवर आणि 60Nm चा टॉर्क जनरेच करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियरबॉक्ससह येतं.

या कारचं सीएनजी व्हर्जन 31.56kms प्रति किलोग्राम इतकं मायलेज देतं आसा दावा कंपनीनं केला आहे. याची फ्युअल कॅपेसिटी 60 लिटर आहे आणि ही कार दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमती 4.37 लाखांपासून 4.41 लाखांपर्यंत आहे.

Maruti S-Presso: मारुती सुझुकीची मिनी एसयुव्ही म्हणून ओळखली जाणारी ही कार कंपनी फिडेट सीएनजीसह येते. याच्या सीएनजी व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. ते 67hp ची पॉवर आणि 90Nm चा टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. यामध्ये 55 लीटर क्षमतेचा फ्युअल टँक देण्यात आला आहे. या कारची किंमत 4.83 लाखांपासून 5.13 लाख इतकी आहे. सीएनजीसह ही कार 31.2 km/kg चा एव्हरेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

Maruti Wagon R CNG: मारुती सुझुकीची ही कारदेखील कंपनी फिटेड सीएनजीसह येते. या कारच्या सीएनजी व्हेरिअंटमध्ये 1.0 लिटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरण्यात आलं आहे. ते 58hm ची पॉवर आणि 78Nm चा टॉर्क जनरेट करते.

यामध्ये 60 लिटर क्षमतेचं फ्युअल टँक देण्यात आला आहे. या कारची किंमत 5.29 लाखांपासून 5.36 लाखांपर्यंत आहे. या कारचं एव्हरेज 32.52 km/kg इतका असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

Hyundai Santro CNG: ह्युंदाईची ही सर्वात स्वस्त असलेली सँट्रो ही कार बजेट इंडियन फॅमिली कार म्हणून परिचयाची आहे. आता कंपनीनं नव्या रूपात ही कार सादर केली आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.1 लिटरच्या बाय फ्युएल इंजिनचा वापर केला आहे.

हे इंजिन 59hp ची पॉवर आणि 85Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 60 लीटर क्षमतेचा फ्युअल टँक देण्यात आला आहे. या कारची किंमत 5.86 रूपयांपासून 5.99 लाख रूपयांपर्यंत आहे. ही कार 30.48km/kg चा एव्हरेज देते.

Maruti Celerio CNG: मारुती सुझुकी ही कंपनी लवकरच आपली हॅचबॅक कार सेलेरियोचं नेक्स्ट जेन मॉडेल लाँच करणार आहे. या कारचं सध्याचं मॉडेल सीएनजी किटसह विक्रीस उपलब्ध आहे. याच्या सीएनजी व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.0 लिटर क्षणतेच्या पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

हे इंजिन 58hp ची पॉवर आमि 78Nm चा टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 60 लीटर क्षमतेचा फ्युअल टँक देण्यात आला आहे. या कारची किंमत 5.62 लाखांपासून 5.72 लाखांपर्यंत आहे. ही कार 30.47 km/kg चा एव्हरेज देते. (नोट : यामध्ये देण्यात आलेल्या किंमती या एक्स शोरूम दिल्लीच्या आहेत. तसंत कारचं एव्हरेज कंपनीच्या वेबसाईटनुसार देण्यात आलं आहे. ते चालवण्याची पद्धत, स्पीड आणि रस्त्यांवर अवलंबून राहू शकतं.)