Maruti Car Discount: कार खरेदीची जबरदस्त संधी! Alto, WagonR सह 'या' कारवर मिळतोय बम्पर डिस्काउंट, लगेच चेक करा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:18 PM2022-08-08T14:18:17+5:302022-08-08T14:27:30+5:30

देशात मारुती सुझुकीच्या कारची जबरदस्त विक्री होते. आता कंपनीकडून आपल्या काही मॉडल्सवर बम्पर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे...

देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांची जबरदस्त मागणी आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विकणारी कार निर्माता कंपनी आहे. जुलै महिन्यातही देशात सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या टॉप-3 कार मारुती सुझुकीच्याच आहेत. याशिवाय, विक्रीच्या बाबतीत टॉप-10 कारमध्ये 7 मॉडेल्स हे मारुती सुझुकीचेच आहेत.

देशात मारुती सुझुकीच्या कारची जबरदस्त विक्री होते. यातच आता कंपनीकडून आपल्या काही मॉडल्सवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. जर आपण मारुती सुझुकीची एखादी कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आपण या डिस्काउंट ऑफर्ससंदर्भात जाणून घेणे आवश्यक आहे.

कंपनीकडून मारुती सुझुकी ऑल्टोवर 8000 रुपयांपर्यंतची रोख सूट ऑफर करण्यात येत आहे. याशिवाय, 10,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 4000 रुपयां ची ISL ऑफरही दिली जात आहे. मात्र, हिच्या सीएनजी व्हेरिअंटवर कसल्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही.

मारुती सुझुकी सेलेरियोवरही कंपनी डिस्काउंट ऑफर देत आहे. सेलेरियोवर 10,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांची एक्सचेन्ज ऑफर दिली जात आहे. पण यातही, सीएनजी व्हेरिअंटवर कसल्याही प्रकारची सूट नाही.

मारुती सुझुकी एस-प्रेसोवर 35,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचे एक्सचेन्ज बोनस आणि 4000 रुपयांपर्यंत आयएसएल ऑफर (निवडक व्हेरिअंटवर) देण्यात येत आहे. हा डिस्काउंट व्हेरिअंटनुसार, वेगवेगळा असू शकतो.

मारुती सुझुकी वॅगनआरवर 10,000 रुपयांची रोख सूट 15000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5000 रुपयांचा आयएसएल डिस्काउंट ऑफर आहे. हिच्या CNG व्हेरिअंटवर केवळ 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे.

मारुती स्विफ्टवर 20,000 रुपयांच्या कॅश डिस्काउंटची ऑफर दिली जात आहे. मात्र, हा डिस्काउंट व्हेरिअंटनुसार असेल. तसेच, मारुती डिझायरवर केवळ 5000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 3000 रुपयांची आयएसएल ऑफर आहे.