Maruti Cars Offer: 5.5 लाख किंमत अन् 34 किमीचे मायलेज; Maruti WagonR वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 08:27 PM2022-11-20T20:27:26+5:302022-11-20T20:30:08+5:30

Maruti Cars November Offer: फेस्टिव्ह सीझन संपल्यानंतरही मारुती आपल्या गाड्यांवर डिस्काउंट देत आहे. पाहा ऑफर...

Maruti Suzuki Wagonr Discount: फेस्टिव्ह सीझन संपल्यानंतरही गाड्यांवरील ऑफर्स कायम आहेत. तुम्ही स्वस्त आणि चांगले मायलेज देणाऱ्या गाडीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नोव्हेंबर महीन्यात मारुती सुझुकी (Maruti Suzuki WagonR) आपल्या गाड्यांवर ₹50,000 पर्यंतची सूट देत आहे.

यादरम्यान कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) वरही चांगला डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊन या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात कंपनीने या गाडीची 17,945 यूनिट्स विकली होती. या विक्रीसह वॅगनआर भारतातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी गाडी बनली आहे.

नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकी वॅगनआरवर 40 हजार रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. मारुती वॅगनआरची किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.20 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती वॅगनआर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये येते. पहिले इंजिन 1-लिटर युनिट (67PS आणि 89Nm) आणि दुसरे 1.2-लिटर (90PS आणि 113Nm) आहे. दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे वॅगनआरमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. CNG मध्ये त्याचे मायलेज 34KM प्रति किलो पर्यंत आहे.

मारुतीच्या या हॅचबॅकमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स आणि 14-इंच अलॉय व्हील आहेत. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स आणि हिल-होल्ड असिस्ट आहेत.