Maruti Celerio CNG: Marutiची जबरदस्त कार; CNG वर 35KMचे मायलेज अन् किंमत फक्त 5.25 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 07:49 PM2022-11-28T19:49:18+5:302022-11-28T19:52:03+5:30

Maruti Celerio CNG: देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण CNG कारकडे वळत आहेत.

Celerio CNG: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुले दुचाकीसह चारचाकी गाड्या चालवणे अवाक्याच्या बाहेर गेले आहे.

अशा परिस्थितीत ज्यांना कमी खर्चात गाडी चालवायची असेल, त्यांना इलेक्ट्रिक किंवा CNG गाड्यांचा पर्याय उपलब्ध आहे. पण, सध्या इलेक्ट्रिक कार्स खूप महाग आहेत. त्यामुळे, कमीत किमतीत CNG कार सर्वात चांगला पर्याय आहे.

अनेक कार कंपन्या CNG कार सेगमेंटवर फोकस करत आहेत. या सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त कार्स उतरवण्याचा कंपन्याचा प्रयत्न आहे. सध्या या सेगमेंटवर मारुती सुझुकीची चांगली पकड आहे.

मारुती सुझुकी सध्या 10पेक्षा जास्त CNG मॉडेल विकत आहे. मारुतीकडे CNG वर सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार्स आहेत. यातील एक कार म्हणजे, मारुती सुझुकी सेलेरियो. ही CNG कार 35 किलोमीटरपेक्षा जास्तीचे मायलेज देऊ शकते.

मारुती सेलेरियो (पेट्रोल, एमटी) 25.24 KMPL पर्यंतचे मायलेज देते. तर, CNG वर 35.6 किलोमीटर प्रती किलोग्रामपर्यंतचे मायलेज मिळू शकते. CNG सोबत यात फक्त मॅन्युअल ट्रांसमिशन मिळतो.

मारुती सेलेरियोची किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. याचे ट्रिम लेव्हल- एलएक्सआय, वीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय+, असे चार मॉडेल आहेत. CNG चा पर्याय वीएक्सआय व्हेरिएंटमध्ये मिळतो, ज्याची किंमत 6.69 लाख रुपये आहे.