Maruti Fronx Launch: शानदार सेफ्टी, दमदार पॉवर अन् जबरदस्त मायलेज; लॉन्च झाली Maruti ची स्वस्त SUV...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 02:44 PM2023-04-24T14:44:01+5:302023-04-24T14:51:05+5:30

मारुती सुझुकीने आपली सर्वात स्वस्त SUV Fronx भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स.

Maruti Fronx Launched: देशातील दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकीने अखेर आपली सर्वात स्वस्त SUV Maruti Fronx भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि शक्तिशाली इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची किंमत लो मॉडेलसाठी 7.46 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 13.13 लाख रुपयांपर्यंत जाते.

बाजारात ही कार प्रामुख्याने टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणारी एसयूव्ही टाटा नेक्सॉनला टक्कर देईल. कंपनीच्या प्रीमियम NEXA डीलरशिपवरुन या कारची विक्री होईल. या कारसाठी आधीच बुकिंग सुरू झाले आहे.

मारुती सुझुकीने मागच्या ऑटो एक्सपोमध्ये आपल्या नवीन Maruti Fronx ला सादर केले होते. त्या दरम्यान या एसयूव्हीची बुकिंग सुरू झाली होती. या एसयूव्हीची अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत होते. कंपनीने ही एसयूव्ही एकूण 5 व्हेरियंटमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा यांचा समावेश आहे.

नवीन मारुती फ्रॉन्क्स कंपनीच्या दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. एक आहे 1.0 टर्बो-पेट्रोल आणि दुसरे आहे 1.2 पेट्रोल इंजिन. हे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

या गाडीचे टर्बो पेट्रोल इंजिन 100 पीएस पॉवर आणि 147Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, के-सिरीज इंजिन 89.73 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. ही SUV 5-स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह दिली जाईल.

या कारचे 1.2 लीटर पेट्रोल व्हेरिएंट 21.79 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देईल. तसेच, याचे 1.0 लीटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.5 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 20.01 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देईल.

कंपनीने या एसयूव्हीचे इंटीरियर ड्युअल टोन थीमने सजवले आहे. लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, क्रोम इंटिरियर डोअर हँडल, प्रीमियम फॅब्रिक सीट बेल्ट, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग, पार्सल ट्रे, वायरलेस चार्जर, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, कीलेस एंट्री, वॉर्म सिटिंग, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एसी व्हेंट्स.

डेल्टा व्हेरियंटमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉईस असिस्टंट फीचर्स, ओव्हर-द-एअर फीचर्स अपडेट, 4-स्पीकर साउंड सिस्टीम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर आणि स्टीयरिंग व्हील-माउंटेड कंट्रोल्स इत्यादी उपलब्ध आहेत.

सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर व्ह्यू कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, पॉइंट ELR सीट बेल्ट्स, रियर डिफॉगर, अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट रिस्ट्रेंट सिस्टीम, इनसाइड रीअर व्ह्यू मिरर उपलब्ध आहे.