Maruti Alto वर मेगा ऑफर! केवळ ५० हजार भरा अन् कार घरी न्या; पाहा, सर्व डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:35 PM2022-02-15T12:35:12+5:302022-02-15T12:42:08+5:30

फॅमिली कार म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेल्या मारुती अल्टोवर चांगली ऑफर आहे. जाणून घ्या...

गेल्या अनेक वर्षांपासून Maruti Suzuki देशातील पहिल्या क्रमांकाची कार विक्री करणारी कंपनी ठरत आहे. मारुतीच्या कारची १ ते सव्वा लाख युनिटची प्रति महिना विक्री होताना पाहायला मिळत आहे. स्वदेशी असो किंवा विदेशी, मारुतीच्या आसपासही कोणती कंपनी नाही.

मारुती सुझुकीच्या काही अपवाद वगळता जवळपास सर्वच कार प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. इतकेच नाही तर, मारुतीच्या कारने एकापेक्षा एक विक्रीचे उच्चांकही नोंदवले आहेत. मारुतीच्या कारचा बोलबाला कायमच भारतीय बाजारावर असलेला पाहायला मिळत आहे.

यातच आता आतापर्यंत देशात सर्वाधिक खपाची ठरलेली Maruti Alto आता नवीन अवतारात भारतीय ग्राहकांसमोर सादर केली जाणार आहे. त्याधाी कंपनीने या कारवर एक मेगा ऑफर दिली आहे. तुम्ही Maruti Alto खरेदी करायचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते.

Maruti Alto 800 ग्राहकांची सर्वात जास्त पसंत केली जाणाऱ्या कारपैकी एक आहे. ही कार फॅमिली कार म्हणून जास्त लोकप्रिय आहे. तुम्हाला मारुती ऑल्टो ८०० ला खरेदी असल्यास केवळ ५० हजार रुपयाचे डाउन पेमेंट करून कार घरी नेऊ शकता.

Maruti Alto 800 ची किंमत ३.२५ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते. ४.९५ लाख रुपये पर्यंत किंमत जाते. मारुती ऑल्टोचे मायलेज संबंधी कंपनीचा दावा आहे की, ही कार पेट्रोलवर २२.०५ किमी प्रति लीटर आणि सीएनजी वर ३१.५९ किमी प्रति किलोग्रॅम पर्यंत मायलेज देते.

Maruti Alto 800 या बजेट कारमध्ये बीएस ६ नॉर्म्स आहे. ०.८ लीटर ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. मारुती ऑल्टो ८०० च्या फीचर्स मध्ये यात ७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले आहे. जे अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेशी कनेक्ट होऊ शकते.

यात कीलेस एन्ट्री आणि फ्रंट पॉवर विंडो सुद्धा आहे. यात पॅसेंजर सेफ्टीसाठी ड्रायवर साइड एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस सोबत ईबीडी सारखे फीचर्स दिले आहेत. फक्त ५० हजार रुपयाचे डाउनपेमेंट करून Maruti Alto 800 STD Petrol कार खरेदी करू शकता.

Maruti Alto 800 ही कार ५० हजार रुपयाचे डाउनपेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला ९.८ टक्क्यांच्या बँक लोन हिशोबाप्रमाणे ५ वर्षासाठी या कारचा ईएमआय ६५५१ रुपये प्रति महिना द्यावा लागेल. या सोबतच फायनान्स केल्यास तुम्हाला ५ वर्षासाठी ८३ हजार २९६ लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

Maruti Alto 800 वर मिळणारे लोन, डाउन पेमेंट आणि व्याज दर तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोरवर अवलंबून आहे. जर तुमची बँकिंग किंवा सिबिल स्कोर मध्ये निगेटिव्ह रिपोर्ट येत असेल तर बँक या तिन्ही मध्ये बदल करू शकते.

दरम्यान, Maruti Alto न्यू जनरेशन लवकरच लॉंच केली जाणार आहे. न्यू जनरेशन मॉडेलमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. याच्या इंटिरियरला जास्त प्रीमियम बनवले जाणार आहे. मात्र, इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, असे सांगितले जात आहे.

Maruti Alto च्या न्यू जनरेशन मॉडेलच्या ओव्हरऑल लांबी आणि रुंदीमध्ये बदल केला जाणार नाही. कारमध्ये नवीन ग्रील, हेडलँम्प्स आणि बंपर दिले जावू शकते. कारची उंची काहीशी वाढवली जाऊ शकते. Maruti Alto न्यू जनरेशनमध्ये कारमध्ये आधीच ७६९ सीसीचे ३ सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकतो.

Maruti Alto 2022 मध्ये कंपनीचे हलके Heartect प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. हाच प्लॅटफॉर्म मारुती स्विफ्ट, डिझायर आणि अर्टिगामध्ये वापर केला जावू शकतो. यात नवीन इंस्ट्रूमेंट कलस्टर, चारही पॉवर विंडो आणि कीलेस एन्ट्री सारखे फीचर्स दिले जावू शकते. सीएनजी किट शिवाय, कार मध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी मिळू शकते, अशी चर्चा आहे.