Maruti suzuki alto and datsun redi go two cheapest cars in india that comes under 3 lakh rupees
तुमच्या बजेटमध्ये!; 3 लाखांपेक्षाही कमी किंमतीच्या 'या' दोन 'ढासू' कार By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 9, 2021 04:52 PM2021-02-09T16:52:41+5:302021-02-09T17:14:59+5:30Join usJoin usNext आपण नवी कार विकत घेण्याचा विचार करत असाल आणि आपले बजेट तीन लाख रुपयांपेक्षाही कमी असेल तर आज आम्ही आपल्यासाठी दोन अशा कार घेऊन आलो आहोत, ज्यांची सुरुवातीची किंमत तीन लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. या कारमध्ये Datsun Redi-Go आणि Maruti Suzuki Alto यांचा समावेश आहे. आम्ही आज आपल्याला या दोन्ही कारचे इंजिन, परफॉर्मन्स आणि ट्रान्समिशन संदर्भात माहिती देणार आहोत. याशिवाय, याशिवाय आम्ही आपल्याला यांच्या किमतींसंदर्भातही सांगणार आहोत. यानंतर, तीन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतली कोणती कार आपल्यासाठी सर्वात बेस्ट ठरेल याचा निर्णय आपण स्वतःच घेऊ शकाल. तर टाकूयात एक नजर या दोन्ही कारवरते... Datsun Redi-Go - किंमत - भारतीय बाजारात Datsun Redi-Go दिल्ली एक्स-शोरूममधील सुरुवातीची किंमत 2.86 लाख रुपये आहे. ती या कारच्या टॉप एंड व्हेरिएंटवर 4.82 लाख रुपयांपर्यंत जाते. इंजिन - Datsun Redi-Go भारतीय बाजारात 0.8-लिटर आणि 1-लिटर इंजिनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. परफॉर्मन्स - Datsun Redi-Go चे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएमवर 54 PS ची पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 Nm चा टॉर्क जनरेट करते. तर, Redi-Goचे 1-लिटर इंजिन 5500 आरपीएमवर 68 PSची पॉवर आणि 4250 आरपीएमवर 91 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारचे इंजिन 5 स्पिड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेले आहे. ट्रान्समिशन - Datsun Redi-Goचे 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन असलेले आहे. तर, या कारचे 1-लिटर इंजिन 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेले आहे. Maruti Suzuki Alto - किंमत - Maruti Suzuki Alto ची दिल्ली एक्स-शोरूममधील सुरुवातीची किंमत 2.99 लाख रुपये एवढी आहे. इंजिन - Maruti Suzuki Alto मध्ये पॉवरसाठी 796 सीसी, 3-सिलिंडर, 12-वाल्व, BS-6 कम्प्लायंट असलेले इंजिन देण्यात आले आहे. परफॉर्मन्स - या कारच्या पॉवर परफॉर्मन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास या कारचे इंजिन 6000 आरपीएमवर 48PSची मॅक्सिमम पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन - Alto चे इंजिन 5-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन असलेले आहे.टॅग्स :वाहनAutomobile