Maruti Baleno फेसलिफ्ट लॉंचिंगसाठी सज्ज; पहिला टीझर लीक, फर्स्ट लूक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:07 PM2022-02-04T23:07:13+5:302022-02-04T23:12:36+5:30

maruti suzuki baleno 2022 facelift: मारुती सुझुकी बलेनोचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात लॉंच केले जाणार आहे.

आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेत Maruti Suzuki चा दबदबा कायम आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे सव्वा ते दीड लाख वाहने विकून मारुती अनेक महिन्यांपासून नंबर १ वर टिकून आहे. टाटासह अन्य कंपन्या मारुतीच्या आजूबाजूलाही नाहीत.

अशातच मारुती बाजारपेठेतील ट्रेंडला फॉलो करत नवनवीन पर्याय आणि उत्पादने सादर करत आहे. यातच आपली उत्तम खप असलेली बलेनो या कारचा फेसलिफ्ट मारुती लवकरच भारतीय बाजारात सादर करत असून, याचा पहिला टीझर लॉंच करण्यात आला आहे.

सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेचा मोठा फटका मारुतीला बसत असून, यामुळे ग्राहकांची मागणी वेळेवर पूर्ण होऊ शकत नसल्याचे बोलले जात आहे. भारतात मारुती सुझुकीच्या कारला मोठी मागणी आहे. या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच कंपनी स्वस्त किंमतीत कार लाँच करते तसेच या कारचे मायलेज जास्त मिळते.

Maruti Baleno Facelift चे अधिकृत लाँचिंग आधी याचा पहिली टीझर इमेज इंटरनेट वेबवर लीक झाली आहे. पॉप्युलर हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

या कारमध्ये ब्लॅक, फ्रंट ग्रिल, इल्यूमिनिटेड हेडलॅम्प्स, DRLs आणि फॉग लॅम्प्स दिसत आहे. या कारचे प्रोडक्शन आधी पासूनच सुरू करण्यात आले आहे. गुजरात प्लांट मध्ये याचे प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर नेक्सा (NEXA) चे सिलेक्टेड डीलरशीपवर याची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

कंपनी लवकरच याची अधिकृत बुकिंग सुरू करणार आहे. मारुती सुझुकीच्या कारला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. याची अधिकृत लाँचिंग सुरू केल्यानंतर ग्राहक या कारला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

अपडेटेड बलेनो मध्ये अनेक डिझाइन आणि फीचर्स मध्ये खूप बदल पाहायला मिळू शकतो. इंजिन सेटअप मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. कारमध्ये आधीच्या प्रमाणे १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.

अपकमिंग मारुती बलेनो फेसलिफ्टचे इंटिरियर मध्ये खूप काही नवीन दिसेल. ज्यात नवीन डॅशबोर्ड सोबत नवीन एसी कंट्रोल पॅनेल, नवीन एसी वेंट्स, सध्याच्या मॉडलपेक्षा मोठे फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत अनेक नवीन स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळू शकते.

माारुती सुझुकी कंपनी आपली नवीन मारुती बलेनो कारला लवकरच लाँच करणार आहे. या कारमध्ये नवीन सरप्राइज फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. या कारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. याची बुकिंग काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.