Maruti Suzuki Cars : १.५ लाखांच्या डाऊनपेमेंटवर खरेदी करा Maruti Ertiga; पाहा किती असेल EMI, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:58 AM2023-04-03T08:58:02+5:302023-04-03T09:03:27+5:30

Maruti Ertiga LXI And VXI Car Loan EMI Down Payment: मारुती सुझुकी अर्टिगाचं बेस व्हेरिएंट एर्टिगा एलएक्सआय आणि टॉप सेलिंग व्हेरिएंट मारुती एर्टिगा व्हीएक्सआय केवळ १.५ लाख रुपयांचं डाऊनपेमेंट करून फायनॅन्ससह घरी नेऊ शकता.

भारतात 7 सीटर कार खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे आणि अशा परिस्थितीत मारुती सुझुकी अर्टिगा आणि किया कॅरेन्स सारख्या MPV ची विक्री वाढत आहे. तुम्ही फक्त 1.5 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह सुलभ हप्त्यांवर मारुती अर्टिगाला फायनॅन्स करून घरी नेऊ शकता.

सध्या मारुती सुझुकी अर्टिगा LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या 4 ट्रिम लेव्‍हलच्या एकूण 7 व्हेरिअंटमध्ये विकली जाते. याची एक्स-शोरूम किमत 8.49 लाख ते रु. 12.93 लाखांपर्यंत असेल.

या एमपीव्हीमध्ये 1462 cc पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तसंच ही कार फॅक्टरी फिटेड CNG पर्यायामध्ये देखील उपलब्ध आहे. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या अर्टिगाचं मायलेज 20.51 kmpl ते 26.11 km/kg आहे. ही एमपीव्ही लूक आणि फीचर्सच्या बाबतीतही जबरदस्त आहे.

मारुती सुझुकी अर्टिगाच्या बेस मॉडेलची अर्टिगा एलएक्सआय एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 9.61 लाख रुपये आहे. जर तुम्ही Ertiga LXI पेट्रोल मॉडेल 1.5 लाख रुपयांचं डाउनपेमेंट करून फायनान्स केलं तर तुम्हाला 8,11,418 रुपयांचं कर्ज घ्यावे लागेल.

तुमच्या कर्जाचा कालावधी 5 वर्षे असेल आणि व्याज दर 9 टक्के आहे, असं गृहित धरू. असं असल्यास तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी 16,843 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

मारुती सुझुकी अर्टिगाच्या टॉप सेलिंग मॉडेल अर्टिगा व्हिएक्सआयची एक्स शोरुम किंमत 9,63,000 रुपये आणि ऑन रोज प्राईज 10.87 लाख आहे. जर तुम्ही अर्टिगा व्हिएक्स 1.5 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटवर फायनॅन्स करत असाल तर तुम्हाला 9,37,209 रुपयांचं लोन मिळेल.

व्याज दर जर 9 टक्के असेल आणि कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 19,454 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. मारुती एर्टिगाचे हे दोन्ही प्रकार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही मारुती सुझुकी शोरूमला भेट द्यावी. कारची किंमत आणि कर्ज, तसंच मासिक हप्त्याशी संबंधित माहिती तपासणं आवश्यक आहे.