लॉंच होताच ‘या’ देसी कारचा धमाका! ३५ किमीचे भन्नाट मायलेज, वेटिंगही वाढले; तुम्ही केली का बुक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:50 PM2022-03-29T13:50:57+5:302022-03-29T13:54:50+5:30

या कारची विक्री ६ लाख यूनिट पार गेली असून, सध्या भारतीय बाजारात याची प्रचंड मागणी असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली नवीन उत्पादने लॉंच करताना पाहायला मिळत आहेत. यातच या स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी Maruti Suzuki कंपनीनेही कंबर कसली असून, आक्रमकपणे नवीन उत्पादनांवर काम करत आहे.

मारुती कंपनी आताच्या घडीला पारंपारिक इंधन पर्यायांसह CNG कारवरही मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. अलीकडेच मारुतीने आपली प्रचंड लोकप्रिय ठरलेली Celerio कार CNG पर्यायात सादर केली आहे. मारुती सुझुकी सिलेरियो कारचे नेक्स्ट जनरेशन व्हेरिएंट लॉंच होऊन अगदी काही दिवस झाले असतानाच या कारने भारतीय बाजारात धमाका केल्याचे पाहायला मिळत आहे.

Maruti Suzuki Celerio CNG व्हेरियंटला १७ जानेवारी रोजी लाँच करण्यात आले होते. यानंतर ही सर्वात जास्त मायलेज देणारी कार बनली आहे. मारुती कंपनीचा दावा आहे की, सेलेरियो सीएनजी एआरएआय सर्टिफाइट ३५.६० किमीचे मायलेज देते. आताच्या घडीला भारतीय बाजारात या कारची प्रचंड मागणी असल्याचे बोलले जात आहे.

Maruti Suzuki Celerio CNG या कारसाठी अनेक दिवसाचा वेटिंग पीरियड सुरू आहे. ऑल-न्यू सेलेरियोच्या लाँचिंगसोबत या कारची एकूण विक्री ६ लाख यूनिट पार गेली आहे.

सेलेरियोला एस सीएनजी टेक्नोलॉजी सोबत बाजारात उतरवले आहे. सेलेरियोच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये नेक्स्ट जनरेशन ड्युल जेट, ड्युअल व्हीव्हीटी के सीरीज १.० एल इंजिन आहे. हे ५३०० आरपीएमवर ४१.७ केडब्ल्यूचे मॅक्सिमम पॉवर जनरेट करते.

Celerio S-CNG एक फॅक्ट्री फिटेड कार आहे. याची किंमत ६.५८ लाख (एक्स शोरूम) (VXi मॉडल) आहे. सेलेरियोचे पेट्रोल व्हेरियंट ची किंमत ४.९९ लाख रुपये ते ६.९४ लाख रुपये (एक्स शोरूम) या दरम्यान आहे.

मारुती सेलेरियो व्हीएक्सआय सीएनजी ५ सीटर सीएनजी कार आहे. सेलेरियो व्हीएक्सआय सीएनजीमध्ये मल्टी फंक्शन स्टियरिंग व्हील पॉवर, अॅडजस्टेबल एक्सटीरियर रियर व्ह्यू मिरर इंजिन, स्टार्ट स्टॉप बटन अँटी लॉक, ब्रेकिंग सिस्टम अलॉय, व्हील फोग, लाइट्स, फ्रंट पॉवर, विंडो रियर पॉवर, विंडो फ्रंट व्हील, कव्हर्स पॅसेंजर, एअरबॅगसारखे फीचर्स पाहायला मिळतात.

दरम्यान, Maruti Suzuki Celerio CNG च्या सर्व व्हेरिएंटची योग्य माहिती आणि त्यावरील ऑफर जाणून घेण्यासाठी जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरुमला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे. मारुतीची कार खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपकडे जाऊन सविस्तर माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर खरेदी करू शकता.

सध्याच्या घडीला मारुती सुझुकी कारविक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून, गेल्या अनेक महिन्यांपासून हा विक्रम कंपनीने कायम ठेवला आहे.