Maruti Suzuki : 7 सीटरमध्ये या कारचीच डिमांड, विक्रीत ठरली नंबर 1; किंमत कमी आणि मायलेजही अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:23 PM2023-01-10T15:23:48+5:302023-01-10T15:31:02+5:30

7 सीटर कार सेगमेंटमध्ये या कारचाच बोलबाला आहे.

अनेक कारणांमुळे मारुती सुझुकीचे भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये देखील मारुतीने सर्वाधिक गाड्या विकल्या आहेत. मारुती सुझुकीची बलेनो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.

पण, आज आम्ही तुम्हाला अशा 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत, ज्यावर कदाचित कंपनीला सुद्धा खात्री नव्हती की ती 2022 ची सर्वाधिक विक्री होणारी 7-सीटर सेगमेंट MPV ठरेल. या कारने महिंद्राच्या बोलेरो आणि टाटांच्या कारलाही मागे टाकले.

आम्ही मारुती सुझुकीच्या सर्वाधिक मागणी असलेल्या MPV Ertiga बद्दल सांगत आहोत. टॉप टेन कारच्या यादीत एकट्या मारुतीच्या 7 कार असल्या तरी या एमपीव्हीने मारुती सुझुकीला टॉप-1 बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डिसेंबर 2022 च्या शेवटच्या महिन्यात या MPV च्या 12,273 कार विकल्या गेल्या आहेत. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत ही विक्री थोडी कमी आहे. दुसरीकडे, डिसेंबर 2021 च्या तुलनेत मारुती सुझुकीने डिसेंबर 2022 मध्ये या MPV ची अधिक विक्री केली आहे. डिसेंबर 2021 मध्ये, कंपनीनं अर्टिगाच्या केवळ 11,840 युनिट्सची विक्री केली होती.

मारुती अर्टिगामागील सर्वात मोठा विक्रीचे मोठे कारण म्हणजे त्याचे उत्कृष्ट मायलेज. Ertiga चे CNG व्हेरिअंट 26km/kg पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे आणि तसंच कारची किंमत देखील खूप कमी आहे. या कारची किंमत 8.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 12.79 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

या स्वस्त MPV कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 103PS आणि 137Nm जनरेट करते. यामध्ये तुम्हाला सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे.

कारच्या अन्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay सह पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाइट्स, ऑटो एअर कंडिशन, क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्सही मिळतात.