maruti suzuki invicto booking started here is expected features list
जबरदस्त! Maruti Invicto 7 सीटर फक्त २५ हजारांत करा बुक, ५ जुलैला होणार लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:42 PM2023-06-19T16:42:46+5:302023-06-19T17:04:00+5:30Join usJoin usNext ही एमपीव्ही कार ५ जुलै रोजी लाँच होणार आहे. मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत नवीन MPV लाँच करणार आहे. त्याला Maruti Invicto असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने आता त्याचे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक मारुती नेक्साच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा त्यांच्या जवळच्या नेक्सा डीलरशिपला भेट देऊन कार बुक करू शकतात. ही एमपीव्ही 5 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. हे Toyota च्या Hycross वर आधारित असेल आणि Hycross, Kia Carnival, Mahindra XUV700 7-सीटर, Hyundai Alcazar आणि MG Hector Plus या सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. Invicto टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असल्याने, परिमाणे समान राहण्याची शक्यता आहे. त्याची लांबी 4735 मिमी, रुंदी 1850 मिमी, उंची 1795 मिमी आणि व्हीलबेस 2850 मिमी असेल. मारुती इनव्हिक्टोची बूट स्पेस 300 लिटर आहे. या कारची लांबी 4735 मिमी तर रुंदी 1850 मिमी, उंची 1795 मिमी आणि व्हीलबेस 2850 मिमी ग्राउंड क्लीयरन्स 185 मिमी बूट स्पेस 300L इंधन टाकी 52L आहे. मारुती इनव्हिक्टो 2 इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. पहिले 2.0-लिटर पेट्रोल आणि दुसरे 2.0-लिटर पेट्रोल हायब्रिड असेल. Toyota Innova Hycross प्रमाणे, Invicto चे 2.0L पेट्रोल इंजिन 6600rpm वर सुमारे 174PS पॉवर आणि सुमारे 204Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन केवळ CVT ट्रान्समिशनशी जोडले जाण्याची शक्यता आहे. इनोव्हा हायक्रॉसमध्ये 2.0 लीटर पेट्रोल हायब्रिड इंजिन 186PS ची शक्ती आणि 4400rpm मध्ये 206Nm चे टॉर्क आणि मारुती इनव्हिक्टो सारखे आउटपुट आकडे जनरेट करु शकेल. हे इंजिन देखील CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये 'हे' फिचर असणार - 8-वे पॉवर ड्रायव्हर सीट हवेशीर समोरच्या जागा IR-CUT विंडो 10.1 इंच टचस्क्रीन एलईडी फॉग लाईट पॅलड लॅम्प एलईडी डीआरएल कलर एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एम्बीएट लाईट पॅडल शिफ्टर्स ऑटो डिमिंग आईआरवीएम 17 इंच अलॉय व्हील टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) रियर डिफॉगर पॉवर टेलगेट सनरूफटॅग्स :मारुती सुझुकीकारमारुतीMaruti SuzukicarMaruti