Maruti Suzuki launches new Ciaz
Maruti Suzukiने मार्केटमध्ये उतरवली नवी Ciaz By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:11 PM2019-03-31T23:11:43+5:302019-03-31T23:15:14+5:30Join usJoin usNext Maruti Suzukiने ग्राहकांसाठी Ciazचं नवं मॉडल मार्केटमध्ये उतरवलं आहे. वर्ष 2018मध्ये 50 हजारांहून अधिकची विक्री झालेल्या या कारमध्ये मारुतीनं 1.5 लीटरचं इंजिन बसवलं आहे. मारुती कंपनीनं ही कार होंडासिटी आणि ह्युंदाई वर्नाला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवली आहे. या नव्या Ciaz कारमध्ये 1.5 लीटरचं DDiS 225 टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन बसवलं आहे. तसेच Ciazचं 1.5 लीटरचं नवं डिझेल इंजिन 4000 आरपीएमबरोबरच 95 एचपी पॉवर आणि 1500 ते 2500 आरपीएमवर 225 एनएम टॉर्क देणार आहे. या इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळणार आहे. तसेच अनेक नवे फीचर्सही या कारमध्ये पाहायला मिळतील. टॅग्स :वाहनAutomobile