Maruti Suzuki: 'Thar'ला टक्कर देण्याची तयारी, मारुती लॉन्च करणार नवीकोरी 'Jimny'; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:23 PM2022-04-04T21:23:44+5:302022-04-04T21:26:43+5:30

Maruti Suzuki: Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki भारतात लवकरच Maruti Jimny लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय बाजारात महिंद्राची 'थार' खूप लोकप्रिय आहे. पण, आता याच थारला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी आपली नवीन 'जिमनी' लॉन्च करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीची जिमनी लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. कंपनीने 2020 ऑटो-एक्स्पोमध्ये तीन दरवाज्यांची जिमनी सिएरा प्रदर्शित केली होती.

मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, जिमनीला भारतात लॉन्च करण्याच्या पर्यायावर विचार केला जात आहे.

सध्या भारताच्या कार मार्केटमध्ये SUV सेगमेंटचा वाटा 32 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याच कारणामुळे मारुती सुझुकी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV व्हेईकल) सेगमेंटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मारुतीकडे या सेगमेंटमध्ये ब्रेझा आणि एस-क्रॉस या दोनच कार आहेत. जिमनी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

या कारची थेट स्पर्धा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिंद्राच्या 'थार'शी असेल. मारुती सुझुकीच्या जिमनीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ही एसयूव्ही जापान आणि युरोपमध्ये खूप लोकप्रिय झाली असून, याचे उत्पादन भारतात झाले आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून याचे उत्पादन हरियाणातील गुरुग्राम येथे सुरू आहे.