Cheap CNG Cars : तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' CNG गाड्या; दूर होईल पेट्रोलचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 01:41 PM2022-03-08T13:41:45+5:302022-03-08T13:50:52+5:30

Cheap CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) सतत वाढत असलेल्या किमतींमध्ये सीएनजी वाहनांची (CNG Cars) मागणी प्रचंड वाढली आहे.

Cheap CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) सतत वाढत असलेल्या किमतींमध्ये सीएनजी वाहनांची (CNG Cars) मागणी प्रचंड वाढली आहे. नवीन सीएनजी कार घेण्यासाठी गेलात, तर त्यासाठी तुम्हाला वेटिंग पिरिअडदेखील अधिक लागेल.

याशिवाय नवीन कारही खूप महागही आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोक सेकंड हँड सीएनजी कारही विकत घेताना दिसतायत. येथे आम्ही तुम्हाला 3 लाख रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या सेकंड हँड सीएनजी कारबद्दल माहिती देणार आहोत. निरनिराळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून ही माहिती घेण्यात आली आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR 2015) ही कार OLX नुसार तुम्हाला 2 लाख 95 हजार रुपयांना विकत घेता येऊ शकते. पाढऱ्या रंगाची ही सीएनजी कार 51 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

Droom या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto 2015) उपलब्ध आहे. ही कार 15 हजार किलोमीटर चालली आहे. यासाठी विक्रेत्यानं ३ लाख ५ हजार ३५० रुपयांची मागणी केलेली आहे. या कारमध्ये 796cc चं इंजिन देण्यात आलंय. ते 40bhp ची पॉवर आणि 60Nm चा टॉर्क जनरेट करतं.

58 हजार किलोमीटर चाललेली ह्युदांई आय 10 (Hyundai i10 2013) ओएलएक्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासाठी विक्रेत्यानं २ लाख ९० हजार रुपयांची मागणी केली आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR 2013) marutisuzukitruevalue वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार 1,04,882 किमी चालली आहे. ही कार पांढऱ्या रंगाची असून विक्रेत्यानं यासाठी 2 लाख 15 हजार रुपयांची मागणी केली आहे. (टीप : कोणत्याही प्रकारची गाडी खरेदी करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी. हे आर्टिकल केवळ सुविधेसाठी देण्यात आलं आहे.)