Maruti suzuki Will launch MPV XL6 today; will this car helpful
मंदीच्या काळात मारूतीला एमपीव्ही XL6 तारणार का? आज लाँचिंग By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:04 AM2019-08-21T11:04:13+5:302019-08-21T11:09:07+5:30Join usJoin usNext देशातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki आज प्रिमिएम एमपीव्ही XL6 लाँच करणार आहे. कंपनीने या कारची आगाऊ बुकिंगही सुरू केली आहे. मारुती सुझुकीला टाटा, महिंद्रासह नवख्या कंपन्यांकडून कडवी टक्कर मिळू लागली आहे. एमजी मोटर्स, कियासारख्या कंपन्यांनी एमपीव्हीसारखी कार बाजारात आणली आहे. तसेच टाटाने हॅरिअर, ह्युंदाईने व्हेन्यू अशा कार आणल्या आहेत. मारुतीकडे 7 सीटर एकच कार होती. बाजारात टिकून राहण्यासाठी मारुतीला आणखी एका कारची गरज होती. यामुळे मारूतीने XL6 ही कार बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मारुतीची XL6 ही एमपीव्ही कार नेक्साच्या दालनांमधून विकण्यात येईल. सुरूवातीला या कारचे Zeta आणि Alpha असे दोनच व्हेरिअंट विकण्यात येणार आहेत. ही कार प्रिमिअम श्रेणीत आणल्याने या कारची किंमत अर्टिगापेक्षा जास्तच असेल. मारुतीची XL6 या कारची किंमत 9.5 लाख ते 11.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या कारची टक्कर महिंद्राच्या मराझोशी होणार आहे. मराझो कार केवळ डिझेल व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. पुढील वर्षी महिंद्रा या कारला पेट्रोल इंजिनही देणार आहे. मारुतीची XL6 या कारचे रंग Premium Silver, Magma Gray, Auburn Red, Brave Khaki (New), Arctic White आणि Nexa Blue असे असू शकतात. यामध्ये 1.5 लीटरचे K15B पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन हायब्रिड सिस्टिमसह असेल. हे इंजिन 105 PS ची ताकद आणि 138 Nm टॉर्क उत्पन्न करू शकेल. मॅन्युअल ट्रान्समिशन 19.01 kmpl आणि अॅटोमॅटीक ट्रान्समिशन 17.99 kmpl चे मायलेज देईल. टॅग्स :मारुती सुझुकीकारमहिंद्राएमजी मोटर्सकिया मोटर्सMaruti SuzukicarMahindraMG MotersKia Motars Cars