Maruti Swift चे नवीन मॉडेल पाहून वेड लागेल, तब्बल 40Kmpl चे मायलेज; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:43 PM2022-12-26T16:43:32+5:302022-12-26T16:46:23+5:30

मारुती सुझुकीने 2022 मध्ये आपल्या बलेनो हॅचबॅकपासून ब्रेझा एसयूव्हीपर्यंत अनेक गाड्यांना अपग्रेड केले आहे.

Maruti Swift 2023: मारुती सुझुकीने 2022 मध्ये आपल्या बलेनो हॅचबॅकपासून ब्रेझा एसयूव्हीपर्यंत अनेक गाड्यांना अपग्रेड केले आहे. परंतू, परवडणाऱ्या किमतीत कार खरेदी करण्याची इच्छा असणारे अनेक ग्राहक मारुती स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) च्या नवीन मॉडेलची वाट पाहत आहेत.

ही कार सध्या टेस्टिंग फेजमध्ये असून, 2023 मध्ये लॉन्चिंगची अपेक्षा आहे. नवीन स्विफ्टच्या इंजिनपासून डिझाइनपर्यंतचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. दावा केला जातोय की, ही नवीन स्विफ्ट स्ट्रॉन्ग हायब्रिड तंत्रज्ञानासह बाजारात आणली जाईल.

Maruti Swift 2023 चे डिझाइन- सध्या बाजारात असलेल्या स्विफ्टच्या तुलनेत नवीन स्विफ्टला स्पोर्टी लूक दिला जाईल. या हॅचबॅकच्या पुढील बाजुस नवीन डिझाइन असलेले ग्रिल आणि नवीन एलईडी एलिमेंटसह स्लीक हेडलँप असतील. याशिवाय अपडेटेड फ्रंट बंपर, ब्लॅक-आउट पिलर, व्हील आर्चवर फॉक्स एअर वेंट आणि रुफ माउंटेड स्पॉइलर दिले जातील.

Maruti Swift 2023 इंजिन आणि मायलेज- रिपोर्ट्सनुसार, या नवीन स्विफ्टध्ये टोयोटाचे स्ट्रॉन्ग हायब्रिड तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार असू शकते. हायब्रिड टेक्नोलॉजीसह स्विफ्ट हॅचबॅक सूमारे 35-40kmpl (ARAI सर्टिफाइड) मायलेज देईल.

किंमत- लूक आणि फीचर अपग्रेडसोबतच या नवीन स्विफ्टची किंमतही थोडी जास्त असू शकते. याच्या हायब्रिड आणि नॉन-यइब्रिड व्हर्जनच्या किमतीमध्ये 1.50 ते 2 लाख रुपयांचा फरक असू शकतो. ऑल-न्यू स्विफ्टला 2023 च्या अखेरपर्यंत किंवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते.