Mercedes-Benz ची स्वस्त एसयुव्ही लाँच; किंमत 52.75 लाखांपासून सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:35 PM 2019-12-03T17:35:25+5:30 2019-12-03T17:38:31+5:30
Mercedes-Benz या जगविख्यात कार कंपनीने मंगळवारी भारतात GLC SUV ची फेसलिफ्ट एसयुव्ही लाँच केली आहे. या एसयुव्हीची किंमत 52.75 ते 57.75 लाख रुपये आहे. Mercedes-Benz GLC SUV च्या स्टाईलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शिवाय या कारमध्ये बीएस 6 श्रेणीचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये जीएलसी फेसलिफ्टमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये MBUX इन्फोटेनमेंट सिस्टिम लेटेस्ट व्हर्जनसोबत ‘Hey Mercedes’ व्हॉईस कमांड इंटरफेस आणि एक मोठे सेंट्रल टचपॅड मिळते. हे फिचर जीएलसी रेंजच्या एसयुव्हीमध्ये पहिल्यांदा देण्यात आले आहे.
याशिवाय जीएलसी फेसलिफ्टमध्ये फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अपडेटेड टेक्स्चर दिले आहे.
जीएलसी फेसलिफ्टमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 197 एचपीची ताकद प्रदान करते आणि 300 एनएमचा टॉर्क प्रदान करते. शिवाय 2.0 लीटरचे डिझेल इंजिनही देण्यात आले आहे जे 190 एचपीची ताकद आणि 400 एनएमचा टॉर्क प्रदान करते.
जीएलसी फेसलिफ्टमध्ये दोन्ही इंजिने बीएस 6 नियमावली पूर्ण करतात.
नव्या अवतारात आलेल्या मर्सिडिसमध्ये ही एसयुव्ही भारतीय बाजारातील लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट, बीएमडब्ल्यू एक्स 3 आणि व्होल्वो एक्ससी 60 ला टक्कर देणार आहे.