Micromax enter in automobile field; first 'indian electric bike' launched
मायक्रोमॅक्स ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरली; पहिली 'देशी' इलेक्ट्रीक बाईक आली By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 06:24 PM2019-06-18T18:24:51+5:302019-06-18T18:30:06+5:30Join usJoin usNext मायक्रोमॅक्सच्या मालकाने ऑटोमोबाईल क्षेत्रात नशीब आजमविण्याचे ठरविले आहे. आज देशातील पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्यात आली. Revolt RV 400 असे या बाईकचे नाव असून 25 जूनपासून अॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर बाईक बुक करता येणार आहे. मायक्रोमॅक्स या भारतीय मोबाईले कंपनीचे मालक राहुल शर्मा यांनी ही कंपनी सुरु केली आहे. कंपनीने अद्याप या बाईकची किंमत जाहीर केली नसून 1 हजार रुपयांच्या टोकनमध्ये ही बाईक बुक करता येणार आहे. पहिल्या चार महिन्यांमध्ये Revolt Intellicorp कंपनी या बाईकची विक्री दिल्ली-NCR, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये करण्यात येणार आहे. Revolt RV 400 या बाईकचा जास्तीतजास्त वेग 85 किमी आहे. तर, ARAI नुसार ही बाईक एका चार्जिंगमध्ये 156 किमी धावते. या बाईकमध्ये काढता येणारी बॅटरी देण्यात आली आहे. या बाईकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही बाईक चालकाचा रायडींग पॅटर्न नोंद करणार आहे. याशिवाय बाईकची रेंज, रायडिंग स्टाईल आणि बिघाडाची माहिती देणार आहे. याशिवाय ऑल-LED लाइटिंग, फुल्ली डिजिटल डॅश आणि 4जी कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे. टॅग्स :वीजेवर चालणारं वाहनबाईकelectric vehiclebike