एक किलोमध्ये 35 किमीचे मायलेज, या आहेत भारतातील टॉप-5 CNG कार; किंमत फक्त... By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:21 PM 2022-06-12T15:21:31+5:30 2022-06-12T15:25:18+5:30
Best Mileage CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण, सीएनजीच्या किमती सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. Best Mileage CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी(Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण, सीएनजीच्या किमतीत किरकोळ वाढ (CNG Price List) होऊनही किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप-5 सीएनजी कार्सबद्दल(India's Top-5 CNG Cars) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडणार नाही. यापैकी काही फक्त 75 रुपयांमध्ये 35 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात.
Maruti Celerio CNG- सीएनजी कारमध्ये मुरुतीचा(Maruti Suzuki) दबदबा आहे. यातही त्यांची लोकप्रिय मारुती सेलेरिओ(Maruti Celerio) देशात सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल आणि सीएनजी कार आहे. ही गाडी एक किलो सीएनजीमध्ये 35.60 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.69 लाखांपासून सुरू होते.
WagonR CNG- मारुती सेलेरियो प्रमाणे ही कंपनीची दुसरी हॅचबॅक कार आहे. मारुती वॅगनआर सीएनजी(WagonR CNG) मायलेजमध्ये कोणाहीपेक्षा कमी नाही. ही कार 1 किलो CNG मध्ये 34.05 किमी मायलेज देते. याची किंमत 6.42 लाख रुपयांपासून सुरू होते.
Maruti Alto CNG- देशातील सर्वात स्वस्त कार असलेल्या मारुती अल्टोच्या सीएनजी(Maruti Alto CNG) व्हेरिएंटची किंमत 5.03 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार एक किलो सीएनजीमध्ये ते 31.59 किमीचे जबरदस्त मायलेज देते.
S-Presso CNG- मारुतीची ही दुसरी सीएनजी कार आहे. मारुती एस-प्रेसो(S-Presso CNG) सीएनजीसुद्धा मायलेजमध्ये उत्तम आहे. ही कार 1 किलो सीएनजीमध्ये 31.2 किमीचे जबरदस्त मायलेज देते. याची किंमत 5.38 लाख रुपयांपासून सुरू होते.
Tata Tiago CNG - टाटा मोटर्सने (Tata Motors) या वर्षी आपल्या सीएनजी कार बाजारात लॉन्च केल्या होत्या. टाटाची टाटा टिगोर(Tata Tiago) CNG मायलेजमध्ये जबरदस्त आहे. ही कार एक किलो सीएनजीमध्ये 26 चे मायलेज देते. याची किंमत 6.10 लाखांपासून सुरू आहे.