New Maruti Alto K10 भारतात लाँच; लूक, किंमत आणि मायलेज पाहून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:42 PM 2022-08-18T14:42:25+5:30 2022-08-18T14:45:45+5:30
Maruti Suzuki Alto K10 New Model 2022 launched: बऱ्याच दिवसांपासून अनेकांना होती या कारची प्रतिक्षा. कंपनीनं काही दिवसांपूर्वी लाँच केला होता कारचा टिझर. Maruti Suzuki Alto K10 New Model 2022 launched: मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली नवीन कार लाँच केली आहे. Maruti Suzuki Alto K10 असं या कारचं नाव आहे. ही एक बजेट कार आहे आणि या कारचे जुने व्हर्जन्सदेखील अतिशय लोकप्रिय झाले होते. तसंच, ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे.
मारुतीची ही हॅचबॅक कार नवीन डिझाइन आणि उत्कृष्ट इंटिरियरसह लाँच करण्यात आली आहे. ऑल्टोच्या या नव्या व्हेरिअंटमध्ये उत्तम फ्युअल एफिशिअन्सी आणि अधिक पॉवर पाहायला मिळेल. ही कार 24.9 kmpl चं मायलेज देऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आपण या कारची किंमत, फीचर्स आणि इतर बाबींबद्दल जाणून घेऊया.
नवीन मारुती अल्टो K10 ची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 5.83 लाख रुपये असेल. ह्यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सदेखील मिळेल. कंपनीने ही कार एकूण चार व्हेरिअंटमध्ये सादर केली आहे. याशिवाय Alto K10 LXi 4,82,000 रुपये एक्स शोरूम, Alto K10 VXi ची किंमत 4,99,500 एक्स शोरूम आणि ऑटो व्हेरिअंटची किंमत 5,49,500 रूपये एक्स शोरूम, Alto K10 VXi 5,33,500 रूपये आणि ऑटो व्हेरिअंटची किंमत 5,83,500 रूपये एक्स शोरूम इतकी निश्चित करण्यात आलीये.
नवीन अल्टोच्या फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास, यात १५ नवीन सेफ्टी फीचर्स मिळतील. ज्यात EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, सीट बेल्ट प्री टेन्शनर आणि इतर फीचर्स समाविष्ट आहेत. नवीन मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये फिफ्थ जनरेशन हार्टेक्ट प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. यात 13-इंचाची व्हिल्स असून चांगला ग्राउंड क्लियरन्स देण्याचंही काम करतात.
ग्राहकांना मारूती सुझुकी एरिना आऊटलेटमधून ही कार बुक करता येणार आहे. यासाठी केवळ 11 हजार रूपयांचं टोकन द्यावं लागेल. या नव्या ऑल्टो के 10 मध्ये 7 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. यापूर्वी ही सिस्टम एस प्रेसो, सेलेरिओ आणि वॅगनआर सारख्या कार्समध्येही देण्यात आली होती. याशिवाय स्टेअरिंग व्हिललाही नव्यानं डिझाईन करण्यात आलंय. स्टेअरिंगवरच इन्फोटेन्मेंट सिस्टमचं माऊंटेड कंट्रोल देण्यात आलंय.