Mukesh Ambani यांच्या ताफ्यात आहेत 'या' 5 सर्वात महागड्या कार, एकीची किंमत 13 कोटी रुपयांहूनही अधिक! By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 07:01 PM 2023-01-16T19:01:47+5:30 2023-01-16T19:24:56+5:30
Mukesh Ambani Car Collection: मुकेश अंबानी यांच्याकडे कारचा मोठा ताफा अद्यापही आहे. त्याच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या गाड्या उभ्या आहेत. तर जाणून घेऊयात मुकेश आंमानी यांच्याकडील सर्वात महागड्या कार संदर्भात... मुकेश अंबानी यांचा व्यवसाय देशाच्या कानाकोपऱ्यापासून परदेशातही पसरलेला आहे. ते एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र आता त्याच्याकडे हा खिताब नाही. पण असे असले तरी, त्यांच्याकडे कारचा मोठा ताफा अद्यापही आहे. त्याच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या गाड्या उभ्या आहेत. तर जाणून घेऊयात मुकेश आंमानी यांच्याकडील सर्वात महागड्या कार संदर्भात...
Rolls Royce Cullinan - भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडे लक्झरिअस कारचा ताफा आहे. त्याच्याकडे रॉल्स रॉयस कलिनन देखील आहे, जिची किंमत सुमारे 13 कोटी रुपये एवढी आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या (2022) सुरुवातीला ही कार घेतली होती
Rolls Royce Phantom - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यंच्याकडे रॉल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपे आधीपासूनच आहे. हिची किंमतही 13 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ही कार पारच सुंदर आहे. तसेच हिचा लुक-फीचर्स आणि कंफर्ट अत्यंत जबरदस्त आहेत.
Mercedes Maybach Benz S660 Guard - मुकेश अंबानी महागड्या आणि लक्झरिअस कारचे चाहते आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीजच्या अनेक पॉवरफूल आणि अल्ट्रा लक्झरी कार आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज मायबॅक बेन्ज एस660 गार्ड देखील आहे. ही कार 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमतीची असल्याचे बोलले जाते.
BMW 760 Li Security (Armoured) - मुकेश अंबानींकडे बुलेटप्रूफ कारही आहेत. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू 760 एलआय सिक्योरिटी (आर्मर्ड) आहे. हिची किंमत 8.50 कोटी रुपये एवढी सांगितली जाते. ही एक बुलेटप्रूफ कार आहे आणि सिक्योरिटीच्या दृष्टीनेही अत्यंत सुरक्षित आहे.
Ferrari SF90 Stradale - मुकेश अंबानींकडे फरारी एसएफ90 स्ट्रॅडेल देखील आहे. जी एक हायब्रिड स्पोर्ट्स कार आहे. ही सर्वप्रथम 2019 मध्ये सादर करण्यात आली होती. ही हायब्रिड तंत्रज्ञानासह येणारे पहिली प्रोडक्शन फरारी कार आहे. हिची किंमत जवळपास 7.50 कोटी रुपये एवढी आहे.