New Car Launches: येत्या 2 आठवड्यात लॉन्च होणार तीन जबरदस्त कार्स, किंमत फक्त 4 लाख रुपयांपासून सुरू... By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:51 PM 2022-08-05T14:51:32+5:30 2022-08-05T14:55:09+5:30
New Car Launches: 2022 ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी खूप चांगले ठरत आहे. आतापर्यंत अनेक नवीन कार्स लॉन्च झाल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून काही लॉन्च होणार आहेत. Upcoming Cars: साल 2022 ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी खूप चांगले ठरत आहे. आतापर्यंत अनेक नवीन कार्स लॉन्च झाल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून काही कार लॉन्च होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तीन नवीन कार लॉन्च होणार आहेत.
14 ऑगस्ट रोजी हुंडई फोर्थ जनरेशन ट्यूसॉन लॉन्च करणार आहे, तर 16 ऑगस्ट रोजी टोयोटा त्यांच्या नवीन अर्बन क्रूजर हायराइडर एसयूव्हीची किंमत जाहीर करणार आहे. याशिवाय, 18 ऑगस्ट रोजी न्यू जनरेशन मारुती ऑल्टो K10 लॉन्च होणार आहे. जाणून घेऊन या कार्सबद्दल संपूर्ण माहिती...
NEW-GEN HYUNDAI TUCSON- 2022 Hyundai Tucson मध्ये 2.0L पेट्रोल ( 156bhp) आणि 2.0L डिझेल (186bhp) इंजिन मिळेल. यात लेव्हल 2 ADAS सिस्टम देण्यात आले आहे. यामुळे कार पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित असेल. पूर्वीपेक्षा याचे व्हीलबेस 150 मिमी वाढवले आहे. या फोर्थ जनरेशन हुंडई ट्यूसॉनमध्ये एलईडी डीआरएलसोबत नवीन डिझाइन केलेले हेडलँप, फ्लेअर्ड आणि अँगुलर व्हील आर्च, 18-इंचचे डुअल-टोन अलॉय व्हीलसारखे फीचर्स आहेत.
TOYOTA URBAN CRUISER HYRYDER- टोयोटाची नवीन मिड-साइज एसयूव्ही अर्बन क्रूझर हायराइडर भारतीय रस्त्यांवर लवकरच दिसणार आहे. या एसयूव्हीमध्ये दोन हायब्रिड पॉवरट्रेन मिळतील. एक असेल सुझूकीच्या 1.5L K15C डुअलजेट पेट्रोल इंजिनसोबत स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान सेटअप आणि दुसरा लिथियम-आयन बॅटरीसोबत टोयोटाचा 1.5L TNGA एटकिसन सायकल सेटअप. SUV मॉडेल लाइनअपमध्ये 7 मोनोटोन आणि 4 डुअल-टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन मिळतील.
NEW-GEN MARUTI ALTO K10- काही दिवसांपूर्वीच 2022 मारुती ऑल्टो K10 चे फोटोज लीक झाले आहेत. हॅचबॅकचे न्यू-जेनरेशन मॉडेल 12 व्हेरिएंटमध्ये येईल, ज्यात 8 मॅनुअल आणि 4 ऑटोमॅटिक सामील आहेत. यात 1.0L K10C पेट्रोल (69bhp) इंजिन आणि सध्या असलेल्या 0.8L पेट्रोल (48bhp) इंजिनचे ऑप्शन मिळेल. याची किंमत 4 लाख रुपयांपासून सुरू होते.